माजी आमदार श्री चंद्रदीप नरके यांची भाजपा जिल्हा कार्यालयाला भेट
करवीर, पन्हाळा, गगनबावडा येथील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
कोल्हापूर दि. 26 महायुतीतील सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल त्यांचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि त्यांना सोबत घेऊन विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यरत राहू असे प्रतिपादन महायुतीचे करवीर विधानसभेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी केले .
महायुतीचीउमेदवारी जाहीर झाल्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर पन्हाळा गगनबावडा या तिन्ही तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी माजी आमदार श्री चंद्रदीप नरके हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आले होते .
यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन उमेदवार चंद्रदीप नरके यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके पुढे म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मला उमेदवारी देत माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे महायुतीतील सर्व घटक पक्षांचा विश्वास या निमित्ताने मी सार्थ ठरवेल भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबरच महायुतीतील अन्य सर्व घटक पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना समानतेची वागणूक देईन .यामध्ये कोणताही भेदभाव करणार नाही .
यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व माजी आमदार सुरेश राव हाळवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले .
यावेळी केडीसी बँकेचे माजी चेअरमन पी .जी शिंदे , बांधकाम चे माजी सभापती के. एस . अण्णा चौगुले, डी आर पाटील , भाजपाचे समन्वयक मेजर भिकाजी जाधव, संयोजक नामदेव काका पाटील, डॉ .के एन पाटील, डॉ . आनंद गुरव, मारोतराव परितकर, संदीप पाटील, सौ सुशीला पाटील , करवीर तालुका अध्यक्ष दत्ता मेडशिंगे,पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार परितकर , गगनबावडा तालुका अध्यक्ष स्वप्निल शिंदे , शिवाजीराव पाटील ,अनिल देसाई,अजितसिंह चव्हाण , ओबीसी जिल्हाध्यक्ष अजिंक्य माळी , अमित कांबळे, प्रकाश पाटील, दत्ता चौगुले, दादासो देसाई, पैलवान सरदार पाटील, आदींसह करवीर पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते . आभार विधानसभा प्रमुख हंबीरराव पाटील यांनी मानले .