माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे निधन.

Spread the news

माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे निधन.

 

गारगोटी प्रतिनिधी :
तिरवडे ता.भुदरगड येथील राधानगरी भुदरगड चे माजी आमदार दिनकरराव भाऊसाहेब जाधव (वय 95 )यांचे निधन झाले.
काँग्रेसचे निष्ठावंत,अजात शत्रू व्यक्तिमत्व,नेहमी हसतमुख नेते अशी त्यांची ओळख होती.राजकीय क्षेत्रात संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या माजी आमदार दिनकराव जाधव यांना ग्रामपंचायती ते आमदारकी पर्यंत सर्व पदांवर काम करण्याची संधी मिळाली.बिद्री साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी त्यांनी पारदर्शक कारभाराचा पाया रोवला.
त्यांनी कोल्हापूरच्या राजकीय पटलावर एक संयमी व सर्वाना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून काम केले.जाधव सरकार घराण्यात जन्म घेतलेले दिनकरराव जाधव हे सरकार दादा म्हणून परिचित होते. त्यांनी निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करताना कडगाव चे सरपंच,भुदरगड चे सभापती, जिल्हापरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य,बिद्री साखर कारखाण्याचे चेअरमन,तालुका संघ संचालक, केडीसिसी संचालक अशा विविध पदावर काम केले. एक निष्कलंक नेतृत्व म्हणून त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात मोठे स्थान होते.ते विधानसभेवर 1978 ते 80 ,
विधान परिषदेवर 1982 ते 88 या कार्यकाळात त्यांनी आमदार म्हणून काम केले.

रविवार 15 रोजी तिरवडे येथे सकाळी दहा वाजता अंत्यविधी होणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!