विद्या प्रबोधनी च्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the news

⁸*आई वडिलांचे कष्ट हीच सर्वात मोठी प्रेरणा*

*विद्या प्रबोधिनी आयोजित* MPSC यशवंतांच्या सत्कार समारंभात पोलीस उप-अधीक्षक क्षीरसागर यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर

MPSC, UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अभ्यासाप्रती आपले संपूर्ण समर्पण आवश्यक आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी उदा. मित्र मैत्रीणी, मौज-मजा, मोबाईल, सोशल मिडिया इ. पासून दूर रहायला हवं. प्रेरणा शोधायचीच असेल तर आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टात शोधा, तुमचे यश हीच त्यांच्या कष्टाची परतफेड आहे.” असा सल्ला पोलीस उप-अधीक्षक श्री सुजीतकुमार क्षीरसागर यांनी  येथे दिला.

विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग तथा बँकिंग मधील विविध परीक्षांतून उत्तीर्ण झालेल्या यशवंतांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष  राहुल चिकोडे हे होते.

सरकारी सेवांमध्ये आल्यानंतर लोकांच्या अडचणीना संयमाने समजून घ्या. लोकांना उत्साहाने आणि हसतमुख सेवा द्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना करिअरचा बी प्लान तयार ठेवा. मार्ग अनेक आहेत, नकारात्मकता झटकाल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवाल असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या वेळी MPSC राज्यसेवा, सरळसेवा, शिक्षक, बँक पी.ओ. बँक क्लर्क इ. परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विद्या प्रबोधिनीचे संचालक श्री राजकुमार पाटील, श्री अमित लवटे, सौ वृंदा सलगर, श्री नितीन कामत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ साऱ्या कुलकर्णी यांनी केले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!