शिवसेनेच्या “लाडकी बहीण” शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* *महिनाभरात शहरात ५० ठिकाणी शिबिरे होणार; राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन*

Spread the news

*शिवसेनेच्या “लाडकी बहीण” शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*महिनाभरात शहरात ५० ठिकाणी शिबिरे होणार; राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन*”

कोल्हापूर दि.११ : मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होवून कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता शहरात ५० ठिकाणी ऑनलाईन अर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, याचा शहरातील लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने लाडकी बहीण योजनेसह मतदार नोंदणी शिबिराचे उद्घाटन आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते खोलखंडोबा हॉल, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे करण्यात आले. आजच्या या पहिल्याच शिबिरास शनिवार पेठ परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना राज्य नियोजन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार काम करणारे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब राज्यातील सर्वच घटकांसाठी लोकहिताचे निर्णय घेण्यात अग्रेसर ठरत आहेत. राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यासह महिला भगिनींसाठी “माझी लाडकी बहीण” योजना सुरु केली आहे. या योजनांमध्ये कागदपत्रांच्या अटी शिथिल करून योजनेची नोंदणी सोपी केली आहे. आज शिवसेनेच्या वतीने या योजनेसह मतदार नोंदणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये कागदपत्रे तपासून ऑनलाईन फॉर्म जमा करून घेतले जातील. ज्या महिलांकडे बँक खाते नाही, अशा महिलांना जागेवरच पोस्ट खाते सुरु करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच नव मतदारांनी मतदान नोंदणी करावी, असे आवाहन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, रमेश खाडे, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, रियाज बागवान, उपशहरप्रमुख सम्राट यादव, कपिल नाळे, विभागप्रमुख उदय पोतदार, नितीन मुधाले, आकाश झेंडे, विकास हंकारे, मुख्यमंत्री संपर्क कक्षाचे हिंदुराव पाटील, सुनील करंबे, गणेश पोवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!