नृसिंहवाडी येथे गणपतराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नृसिंहवाडी करांनी गणपतराव पाटील यांना दिल्या भावी आमदारकीसाठी शुभेच्छा
नृसिंहवाडी/ प्रतिनिधी:
शिरोळ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादा यांच्या प्रचारार्थ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत महिलांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. महाविकास आघाडीचा विजय असो, गणपतराव दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, लक्षात ठेवा हात, सर्वांना सांगा हात, अशा घोषणा देत निघालेल्या प्रचार दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ठिकठिकाणी महिला मतदारांनी गणपतराव पाटील दादा यांचे औक्षण करून भावी आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या.
नृसिंहवाडी येथे शनिवारी सकाळी दहा वाजता श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पदयात्रेस प्रारंभ झाला. यावेळी श्री दत्त मंदिर प्रवेशद्वार इथून सुरू झालेली पदयात्रा देव गल्ली, मारुती मंदिर, ग्रामपंचायत गल्ली, अजिंक्य मंडळ, मरगुबाई चौक, मधली गल्ली, बन भाग, ओतवाडी, अवचित नगर, संभाजीनगर ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी गावात अमाप उत्साहात उत्स्फूर्तपणे काढण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादा यांनी या पदयात्रेत जेष्ठ मतदारांचे आशीर्वाद घेत एक वेळ संधी द्यावी, असे आवाहन केले.
अनंत धनवडे, धनाजी जगदाळे, बाजीराव मालुसरे याचबरोबर उमेदवार गणपतराव पाटील यांनी निवडणुकीमध्ये निवडून देण्याचे आवाहन केले. प्रतीक धनवडे यांनी आभार मानले.
बाळकृष्ण कंदले, तानाजी कदम, किरण माने, शिवाजी भोसले, विनायक काळे, मुरलीधर गवळी, चेतन गवळी, वैभव उगळे, मधुकर पाटील, संजय अनुसे, सागर धनवडे, स्नेहा देसाई, दिगंबर सकट, वसंतराव देसाई, दिनेश कांबळे, रमेश शिंदे, सुरेश कांबळे, राजगोंड पाटील, किरण भोसले, विशाल जाधव, राजू आवळे, राजू पाटील, शशिकांत पुजारी, गुरुप्रसाद पुजारी, सागर अनुसे, मधुकर गवंडी, प्रतिम साळुंखे, जयवंत पतंगे, इम्तियाज तांबोळी, दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय भोसले, दत्तात्रय सुतार, शेखर जिरगे, सरपंच चित्रा सुतार, अर्चना धनवडे, सुप्रिया मुळे, दीपक हिंदोळे, मनोहर कांबळे, रमेश कांबळे, मोहन कांबळे, श्री माणगावे, सनी माने, जनार्दन कुमठेकर, रोहन मिटके, श्रेणिक मदने, संदेश माने, संजय कंदले, विजय माने, ओंकार गवळी, आदित्य मुळे, अक्षय भोसले, अनिकेत माने, तुषार कुन्नूर, गिरीश कंदले, विकास कोळी पंडित शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, मतदार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.