*
अर्थसंकल्प देशाचा मांडला आहे की बिहारचा? शेतकरी, कामगार यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद नाही.
आमदार सतेज पाटील यांची बजेटवर प्रतिक्रिया
बेरोजगारी, महागाई यावर एक चकार शब्द न काढता केवळ जुमलेबाजीच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव देऊ म्हणून आमिष दाखवून मते घेतली. अर्थसंकल्पात मात्र बळीराजाची घोर निराशा झाली आहे.*
*किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखवरून पाच लाख केली. मात्र, यातून शेतकऱ्यांना काय लाभ झाला? खतांच्या किमती रोज वाढत आहेत, महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. पण यावर मार्ग काढण्यासाठी कोणत्याच तरतुदी यात दिसत नाहीत. उलट ज्या मनरेगामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला त्या योजनेच्या निधीत कपात करून केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांना देशोधडीला लावण्याची सुरुवात केली आहे. बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले आहे. पण बेरोजगारीमुळे बारा लाख कमवायचे कसे हा तरुण-तरुणींसमोर मोठा प्रश्न आहे. खतांची दर वाढले घरगुती गॅसची दर वाढले महागाईत कमी करण्याबाबतचे नियोजन अजिबात दिसून येत नाही. आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास या क्षेत्रात निधीची कपात करून ग्रामीण भागातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्याचा डाव दिसत आहे. अल्पसंख्याकांच्या अनेक योजनांचा निधी कमी केला आहे. स्कील इंडियासह विविध योजनांमधून लाखो रोजगाराचे आकडे दाखवले. मात्र, किती जणांना रोजगार मिळाला व मिळणार आहे याची वस्तुस्थिती खूप वेगळी असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. सरकारचा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य लोकांना डावलून धनदांडग्याना पोसणारा आहे.*
*आमदार सतेज पाटील विधानपरिषदेत गटनेते*