डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्तता’* – विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता – डॉ. संजय डी. पाटील यांची माहित

Spread the news

*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्तता’*
– विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता
– डॉ. संजय डी. पाटील यांची माहित

कोल्हापूर

गेल्या १३ वर्षापासून उत्कृष्ट व गुणवत्तावपूर्ण शैक्षणिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) नवी दिल्ली यांच्याकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा (ऑटोनॉमस इंस्टीटयूट) मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी तळसंदे येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले.

तळसंदे येथे डी वाय पाटील संकुलात आयोजित कार्यक्रमात डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आलेल्या स्वायत्तता प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.पाटील यांनी तळसंदे येथे २०११ साली डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसची स्थापना करण्यात आली. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असून, डिसेंबर २०२३ मध्ये फर्स्ट सायकल मध्ये महाविद्यालयाने ३.२५ सी.जी.पी.ए. गुणांसह ‘नॅक’ची ‘ए’ श्रेणी प्राप्त झाली आहे. युजीसी, नवी दिल्लीच्या उच्च स्तरीय समितीने १० वर्षासाठी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला असल्याचे सांगितले. या यशाचा जेवढा आनंद आहे त्यापेक्षा जबाबदारी वाढल्याचे सांगून त्यांनी यापुढे अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.या स्वायत्त महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासूनचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विविध फळझाडे, भाजीपाला व शेतीने बहरलेल्या सुमारे २०० एकरचा हा परिसर ‘ऑक्सिजन झोन’ बनला आहे. अभ्यास, प्रयोग व संशोधन यासाठी विद्यार्थ्याना हे वातावरण अतिशय पोषक आहे. या ठिकाणी सुसज्ज वसतिगृहे व कॅन्टीन सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. आजूबाजूच्या ४० गावामधून याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा पुरवली जाते. त्यामुळे येथील प्रवेश व शिक्षण विद्यार्थ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरेल.

महाविद्यालयाचे शेकडो माजी विद्यार्थी आज देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये नेतृत्व करत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची नोकरी देण्यासाठी महाविद्यालयाकडून कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जातात. त्यासाठी नामवंत कंपन्या दरवर्षी सहभागी होतात. पुढील काळात महाविद्यालय राज्यातील एक अग्रणी स्वायत्त संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल असा विश्वास अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता म्हणाले,स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाल्याने महाविद्यालयाला स्वत:चा स्वतंत्र अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, गुणांकन पद्धती विकसित करता येईल. औद्योगिक मनुष्यबळाच्या मागणीनुसार सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उद्योजकीय अनुभव मिळावा यासाठी महाविद्यालयाने २० पेक्षा जास्त सामंजस्य करार केला आहे. इंटर्नशिपनंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले, महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. उत्तम अभियंते आणि व्यवस्थापक घडविण्यासाठी सर्वच सहकारी प्राध्यापकांचे प्रयत्न सुरु असतात. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याने या प्रयत्नाना अधिक गती मिळून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व पाठबळामुळे हे यश मिळवता आले.

कार्यक्रमास डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर, रजिस्ट्रार प्रकाश भगाजे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा.गुणाली उगळे यांनी केले.आभार प्रा.केदार सहस्त्रबुद्धे यांनी मानले. कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

तळसंदे :डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आलेल्या प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉक्टर की प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, संचालक डॉ. सतीश पावसकर, रजिस्ट्रार प्रा. प्रकाश भगाजे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!