Spread the news

डी वाय पाटील पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद : संजय भगत

कोल्हापूर प्रतिनिधी

डॉ. डी. वाय पाटील पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात मिळवलेले यश अभिनंदनीय आहे , असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष आणि स्मॅकचे संचालक उद्योजक संजय भगत यांनी केले.
सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके उपस्थित होते.
तृतीय वर्षे कॉम्प्युटर शाखेची विद्यार्थिनी नम्रता राणे हिला ९४.४० टक्के गुण मिळविल्याबद्दल अकॅडमीक चॅम्पियन म्हणून गौरवण्यात आले.
भगत पुढे म्हणाले, परीक्षेत मिळवलेले गुण हे विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधोरेखित करतात. प्राप्त परिस्थितीशी दोन हात करत मिळविलेल्या यशाचा आनंद वेगळा असतो. कष्टाची तयारी ठेवल्यास क्षेत्र कोणतेही असले तरी प्रगती निश्चित असते असेही त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला. पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने उंचावत आहे. नोकरिक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.
यावेळी एमएसबीटीई, मुंबई यांच्यावतीने आयोजित उन्हाळी परीक्षेतील ३० गुणवंत विद्यार्थी आणि दोन विषयात १०० पैकी १०० मार्क मिळवलेले पाच विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रवण पोवार,सुतेज शेटगे , स्वराली पाटील, नम्रता राणे, कृष्णा वालकर, तनिष्का चींचनेकर, शंभूराज भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा.पी.के .शिंदे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.शिवांगी मालविया तर आभार प्रा. नीलम रणदिवे यांनी मानले.यावेळी प्रा.अक्षय करपे, प्रा. एस.बी.शिंदे, प्रा.शीतल साळोखे यांच्यासह विद्यार्थी ,पालक आणि स्टाफ उपस्थित होते.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील ,कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!