*डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद* -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा

Spread the news

*डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद*

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने अजिंक्यपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाच्या खो खो मैदानावर ही स्पर्धा झाली.

कुलगुरू डॉ.राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक स्पर्धेत हार-जीत होतच असते, मात्र पराभवाने खचून न जाता खेळाचा आनंद घ्यावा. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आव्हान डॉ. मुदगल यांनी उद्घाटनपर भाषणात केले.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्स चे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, संचालक विद्यार्थी कल्याण डॉ. अद्वैत राठोड, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे डॉ. सुरज यादव, सुशांत कायपुरे, डॉ. रोहित लांडगे उपस्थित होते.

मुलींच्या गटात कॉलेज ऑफ नर्सिंग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या दोन्ही संघात अंतिम सामना झाला. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघाचे 6 – 6 असे गुण झाले त्यामुळे सामना विजयाचा फैसला करण्यासाठी दिलेल्या जादा वेळामध्ये कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने 7-5 गुण फरकांनी विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

कुलपती डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त मा.आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!