मातीतील पोषक द्रव्य निरीक्षण पद्धतीसाठी* *डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला पेटंट*

Spread the news

*मातीतील पोषक द्रव्य निरीक्षण पद्धतीसाठी*
*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला पेटंट*

कोल्हापूर प्रतिनिधी

मशीन लर्निंग आणि आयओटी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मातीमधील पोषक द्रव्यांचे निरीक्षण पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला पेटंट जाहीर झाले आहे. महाविद्यालयाला मिळालेले हे 32 वे पेटंट आहे.

महाविद्यालयाच्या कृत्रिम बुद्धिमता आणि मशीन लर्निंग विभागातील प्रा. पल्लवी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली जतिन सावंत , मानसी चौगले, अक्षदा पाटील आणि मानसी गावडे या विद्यार्थ्यानी ही पद्धती विकसित केली आहे. या प्रणालीने मृदेतील पोषक घटक, त्याचा स्तर व मुल्याकानाची पद्धत सुटसुटीत आणि अधिक प्रभावी झाली आहे.

या प्रणालीत IOT चा उपयोग करून वातावरणीय आकलन केले जाते तर मशीन लर्निंगचा उपयोग करून मृदे संबंधित माहितीचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्याना सबंधित जमिनीमध्ये कोणते पिक घ्यावे, ते कोणत्या काळात घ्यावे, त्यासाठी आवश्यक खते व अन्य घटक याबाबत योग्य सल्ला आणि निर्देश मिळतात.

या नव्या प्रणालीमुळे मृदा स्वास्थ्याची माहिती, उत्पादकता वाढ, शेतकऱ्यांच्या क्षमतेत वाढ होणार आहे. या प्रणालीचा वापर करून मृदा पोषणातील समस्या दूर करणे, त्याचे पोषण वाढवणे शक्य होणार असल्याने शेतकऱ्याना योग्य निर्णय घेण्यास उत्पादकता वाढविण्यास मदत मिळणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!