डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ* *देशात अग्रगण्य बनेल – डॉ. संजय डी. पाटील* -विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Spread the news

*डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ*
*देशात अग्रगण्य बनेल – डॉ. संजय डी. पाटील*
-विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

तळसंदे

येथील डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने केवळ तीन वर्षाच्या काळात केलेली प्रगती अतिशय कौतुकास्पद आणि समाधानकारक आहे. येणाऱ्या काळात हे विद्यापीठ देशात अग्रस्थानी असेल असा विश्वास डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. संजय डी. पाटील बोलता होते. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, अजित पाटील-बेनाडीकर, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गजानन महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी केक कापून तिसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा झाला.

तळसंदे सारख्या ग्रामीण भागात स्थापन केलेले हे विद्यापीठ केवळ तीनच वर्षात नावारूपाला आणल्याबद्दल डॉ. पाटील यांनी यावेळी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. या विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. येथील ज्ञानाचा आणि शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी शेती विकासात योगदान द्यावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. या विद्यापीठात नवनवे अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, सोयी सुविधा देऊन उत्तम दर्जाचे विद्यार्थी घडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. अनुभव शिक्षणावर भर देणाऱ्या या विद्यापीठाचे विद्यार्थी देशाच्या प्रगतीमध्ये नक्कीच योगदान देतील असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यकारी संचालक डॉक्टर ए. के. गुप्ता म्हणाले, विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाची विद्यार्थी संख्या साडेतीन हजारहून अधिक झाली असून येत्या काळात आणखी वेगवान प्रगती होईल याची खात्री आहे.

कुलसचिव डॉ. जे. ए. खोत म्हणाले, विद्यार्थ्यांना काळाच्या गरजेनुसार शिक्षण देण्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. मल्टीमिडीया क्षेत्रातील करिअरसाठी बी. एस्सी इन एआर-व्हीआर हा नवा अभ्यासक्रम यावर्षी सुरु केला आहे. जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्यवान विद्यार्थी घडवण्यासाठी सर्व सहकारी कार्यरत आहेत.

कुलगुरु डॉ. के प्रथापन म्हणाले, विद्यापीठात सुरू असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक व व्यवस्थापन क्षेत्रातील धडे मिळून उत्तम करिअरच्या संधी मिळतील. विद्या वेतनासह इंटर्नशिप सुरू करणारे हे एकमेव विद्यापीठ असावे. कौशल्य विकास विभागाच्या मदतीने अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. देश- विदेशातील अनेक कंपन्यांशी सामंजस्य करण्यात आले आहेत. येत्या काळात प्लेसमेंटच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा विद्यापीठात आपले विद्यापीठ असावा असा प्रयत्न राहील.

अजित पाटील बेनाडीकर म्हणाले विद्यापीठाचा तीन वर्षाचा हा प्रवास अतिशय देदीप्यमान व कौतुकास्पद आहे डॉ. संजय पाटील यांची मेहनत, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी आणि दूरदृष्टी यामुळे विद्यापीठचा नावलौकिक वाढला आहे. येत्या काळात हे विद्यापीठ आणखी मोठ्या उंचीवर पोहचेल विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विविध संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा यादव व शारोन काळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन वित्त अधिकारी श्री सुजित सरनाईक व डॉ. जयंत घाटगे यांनी केले. आभार डॉ.श्रद्धा श्रीवास्तव यांनी मानले.

तळसंदे: डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन केक कापून साजरा करताना डॉ. सजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील, अजित पाटील-बेनाडीकर, डॉ. के. प्रथापन, डॉ. ए.के. गुप्ता, डॉ. जे. ए. खोत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!