दत्ता जाधव यांना पीएच.डी प्रदान
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने राज्यशास्त्र विषयाची पीएच.डी दत्ता जाधव यांना प्रदान केली. ‘भारतातील विसाव्या शतकातील लोकशाही विचार आणि भारतीय राज्यघटना’ या विषयाचे त्यांनी संशोधन केले. जाधववाडी ता.पन्हाळा येथील शाहू मिल कामगाराच्या कुटूंबातून येत जाधव यांनी आपले उच्चशिक्षण पुर्ण केले. ते सध्या विवेकानंद कॉलेज येथे ते अध्यापन करत आहेत. संशोधनासाठी जेष्ठ राजकीय विश्लेषक डॉ.प्रकाश पवार, डॉ.रविंद्र भणगे ,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे,विवेकानंद कॉलेज चे प्राचार्यडॉ.आर.आर.कुंभार,विवेकानंद कॉलेज च्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ.श्रुती जोशी यांनी मार्गदर्शन केले.