डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर* *वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव*

Spread the news

कोल्हापूर

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा 61 वा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.

शिक्षण, कृषी सहकार सह विविध क्षेत्रात क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या डॉ. संजय डी पाटील व त्यांच्या स्नुषा सौ पूजा ऋतुराज पाटील यांना माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील आणि
सौ. शांतादेवी डी. पाटील यांनी शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर कुटुंबीयांकडून केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, आमदार सतेज पाटील, ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील, सौ वृषाली पृथ्वीराज पाटील, यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. संजय डी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थिती लावली. यामध्ये माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, प्रकाश आवाडे, डॉ. सुजित मिणचेकर, नावेद मुश्रीफ, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ ए. एन. जाधव, गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी), डॉ. चेतन नरके, यांच्यासह सर्व संचालक, सचिन झंवर, क्रीडाईचे अजय डोईजड, गौतम परमार, ललित संघवी, गिरीश शहा, प्रताप महाले, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, श्रीराम सोसायटी अध्यक्ष संतोष पाटील व संचालक, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.रघुनाथ ढमकले, डॉ. व्हि. एम पाटील, ऍड अजित पाटील, ऍड अभिषेक मिठारी, संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार व अधिकारी, शिक्षण, सहकार, बांधकाम, राजकीय, सामाजिक व औद्योगिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर व डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी प्राध्यापक कर्मचारी यांनी डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे डॉ. पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर – वाढदिवसानिमित्त केक कापताना डॉ. संजय डी पाटील आणि सौ पूजा ऋतुराज पाटील. सौ शांतादेवी डी. पाटील, यावेळी सौ. वैजयंती पाटील,आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ वृषाली पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!