संस्कृती बिघडवणाऱ्यांना निवडून देणार काय ?
डॉ. नंदिनी बाभुळकर यांचा मतदारांना थेट सवाल
चंदगड
चंदगड येथील उमेदवारांचे नीट बारकाई अवलोकन करा. एक उमेदवार भाजपाचा आहे. दुसरा राष्ट्रवादी अजितदादा गटाचा, तिसरा जनसुराज्य पक्षाचा. म्हणजे तिघेही युतीचेच उमेदवार आहेत. अशा गद्दारांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे. सर्वाधिक उच्चांकी कायदा, व्यवस्थेचा बोजवारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना घडला. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवून टाकली. त्यांना तुम्ही निवडून देणार काय ? असा संतप्त सवाल बेरडी कार्वे येथील कॉर्नर सभेत डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर यांनी व्यक्त केला. आघाडीच्या प्रचारार्थ डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर बोलत होत्या. डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर पुढे म्हणाल्या, चंदगड तालुक्यात दहशतीचा हाहाकार माजला आहे. मतासाठी प्रलोभने दाखवली जात आहेत. महिलांनो, युवकांनो शेवटपर्यंत निर्णय चुकू देऊ नका. अमिषांना लाथाडा. हे उद्योगपतीच सरकार आहे.
यावेळी माजी सरपंच रुक्माण्णा पाटील म्हणाले, मतदार संघ बदलला. त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत आम्ही होतो. त्यांना चंदगडच्या कानाकोपऱ्याची माहिती आम्ही करून दिली. त्यांच्यासाठी जीवाचे रान करून राबलो. आज त्यांची लेक डॉ. नंदिनीच्या पाठिशी त्याच निष्ठेने काम करणार आहोत. कार्वे गावात आमचा प्रबळ गट आहे. गावातील ७० टक्के मतदानघेतल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक विष्णू कार्वेकर यांनी केले. यावेळी रुक्माणा पाटील, मारूती पाटील, लक्ष्मण कांबळे, विष्णू कार्वेकर, रघुनाथपाटील, वैजनाथ राऊत, राजेंद्र पाटील, सागर पाटील, ज्ञानेश्वर कांबळे, तानाजी पाटील, सुनील यळळूरकर, अरूण पाटील, रामू मांडेकर, बाबू पाटील, दुर्गामाता महिला मंडळासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.