*डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर*
*वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव*
90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा 90 वा वाढदिवस मंगळवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी 1984 साली कसबा बावडा येथे पहिले अभियांत्रिकी महविद्यालय सुरू केले. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे डी.वाय’ पाटील ग्रुपचा विस्तार करत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉस्पीटल, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या. दादासाहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आज 8 विद्यापीठे,182 संस्था, 22 हजाराहून अधिक कर्मचारी, सव्वा चार लाखाहून अधिक माजी विद्यार्थी असा संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी मंगळवारी 91 व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीयांनी औक्षण करून दादासाहेबांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. यावेळी दादासाहेब यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तके गरजवंत विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहेत. दादासाहेबाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. विजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, अजिंक्य डी. पाटील, सौ. सुप्रियाताई पाटील, डॉ. नंदिनी पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, सौ. राजश्री काकडे, सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. शिवानी पाटील, सौ. पूजा पाटील, श्री. मेघराज काकडे, डॉ. रष्मित चोलेरा, डॉ.पालशेतकर, आमदार ऋतुराज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, सौ. स्मिता योगेश जाधव, सोमनाथ पाटील, भरत पाटील, करण काकडे, चैत्राली काकडे, सौ. स्नेहल समीर मुळे यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबाना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, अजित पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. डी. आर. मोरे, डॉ. व्ही. एम. पाटील, जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रमाताई बोंद्रे, अभिषेक बोंद्रे, अण्णासाहेब चव्हाण पाटील, धैर्यशील पाटील, गोकुळचे संचालक, श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य,पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दादासाहेबांना शुभेच्छा दिल्या.
कसबा बावडा : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस कुटुंबियांनी उत्साहात साजरा केला.