डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर*

Spread the news

*डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर*

कोल्हापूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये *शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती* आणि *संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी साळुंखे शिष्यवृत्ती* जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध व्हावे असा उद्देश या शिष्यवृत्तीच्या निर्मितीमागे असल्याची माहितीसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे व प्राचार्य विरेन बिरडी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

श्री गावडे सांगितले की,*संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे शिष्यवृत्ती* या योजने अंतर्गत जे विद्यार्थी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत होते त्यांना स्वामी विवेकानंद संस्थेच्या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतले नंतर ट्युशन फी मधील रुपये पाच हजार प्रती वर्ष इतके शैक्षणिक शुल्क संपूर्ण शैक्षणिक कालावधीसाठी माफ होणार आहेत.

*शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती* या योजने अंतर्गत जे विद्यार्थी डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतील त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शैक्षणिक फी मध्ये सवलती मिळतील. या योजेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये 95 पर्सेंटाइल किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये 100% ट्युशन फी माफ होईल तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये 85 ते 94.99 पर्सेंटाइल इतके गुण मिळतील त्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये 75% ट्युशन फी माफ होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये 75 ते 84.99 पर्सेंटाइल गुण मिळतील त्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये 50% ट्युशन फी माफ होईल.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा सौ शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य विरेन भिर्डी यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!