डॉ.आरळींना डावलून भाजपने पुन्हा लिंगायत समाजाला फसविले; बसवराज पाटील.
जतचे विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रमुख भुमिका बजावलेले भाजपाचे जेष्ठ नेते डॉ रविंद्र आरळी यांना विधान परिषदेवर घेतो म्हणून मोठा गाजावाजा केलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ.आरळी यांना विधान परिषदेवर न घेता जत तालुक्यातील लिंगायत समाजावर मोठा अन्याय केला आहे.
जत तालुक्यात बहुसंख्य असणाऱ्यां लिंगायत समाजातील मतदारांनी डॉ.रविंद्र आरळी यांच्या सांगण्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. विधानसभा निवडणुकीतील प्रचारात भाजपच्या प्रत्येक नेत्याने जतमध्ये येऊन पडळकरांना निवडून द्या. जतला विधानपरिषद देऊ असे जाहिर आश्वासन दिले होते. पण डॉ. रविंद्र आरळी, तम्मणगौडा रविपाटील यांना उमेदवारी न देता लिंगायत समाजाला फसविले आणि आता विधान परिषदेला ही डॉ.आरळी यांना डावलून भाजपने लिंगायत समाजावर मोठा अन्याय केला आहे.
पुढील निवडणुकीत भाजपच्या खोट्या आश्वासनाला जत तालुक्यातील लिंगायत समाज बळी पडणार नाही. असे खंत बसवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केला आहे.