डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी कादंबरीस पुरस्कार
कोल्हापूर, ता. २६ – येथील डॉ. अपर्णा पाटील यांच्या भाग्यश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कावेरी या इंग्रजी कादंबरीस पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार मिळाला आहे. कराड येथे आज डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. विनायकराव जाधव, कवी हनुमंत चांदगुडे, माजी प्राचार्या रेखा दीक्षित, स्वाती कुरळे आदी उपस्थित होते. अहमदाबाद येथील पलपब पब्लिकेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. पाटील यांचे हे पाचवे पुस्तक असून यापूर्वी लहान मुलांच्या लघुकथा असणाऱ्या दियाज बागफुल ऑफ स्टोरीजचे दोन भाग, कोल्हापुरातील चौदा उद्योजक महिलांच्या यशोगाथेवर आधारित स्मॉल इज द न्यु बीग, स्वतःच्या जीवनातील अनुभवावर आधारित लघुकथा एन एंगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच डॉ. पाटील यांच्या स्मॉल इज द न्यु बीग या पुस्तकाचे मराठी भाषांतर स्वप्ने लहान अन् उंच भरारी हे सुद्धा प्रकाशित झाले आहे.