एखाद्या व्यक्तीकडे दूरदृष्टी असेल, काम करण्याची हिम्मत असेल, धाडस असेल आणि एखादे उद्दिष्ट ठरवल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत न थांबण्याची क्षमता असेल तर त्या व्यक्तीची प्रगती होऊ शकतेच. शिवाय तो किती शिखरावर पोहोचू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा उल्लेख करावा लागेल. आज त्यांचा 61 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या चौफेर कारकीर्दीवर आणि व्यक्तिमत्त्वावर टाकणारा हा प्रकाशझोत.
डॉ. संजय पाटील यांची ओळख आता फक्त डी. वाय. पाटील यांचा मुलगा अशी राहिलीच नाही. डी. वाय. पाटील यांनी सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून विद्यापीठाची स्थापना केली. केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारत आणि प्रदेशातील त्याच्या शाखा निघाल्या. या शैक्षणिक चळवळीची परंपरा पुढे नेत त्याला एका उंचीवर नेण्याचे काम संजय डी. पाटील यांनी केले. तळसंदे येथील शिक्षण संकुल असू दे किंवा कसबा बावड्यातील आणि पुण्यातील शिक्षण संस्था या सगळ्यांकडे पाहिल्यास संजय पाटील यांची दूरदृष्टी आणि त्यांनी घेतलेले कष्ट सहज लक्षात येते.
लाखो विद्यार्थी या संस्थातून बाहेर पडले आजही हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी घडला पाहिजे त्याला भविष्य काळात उपयोगी पडेल असे शिक्षण मिळाले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी जी शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे. त्यातून अनेक विद्यार्थी आज घडत आहेत.
कोल्हापूर माझं आहे. त्याची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. त्याचा विकास झाला पाहिजे. ही आस मनी बाळवून ते सातत्याने विविध प्रयत्न करत असतात. यातूनच कोल्हापुरात अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून घडल्या. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे हॉटेल सयाजी. कोल्हापूरची प्रतिष्ठा वाढवणारी घटना म्हणजे हॉटेल सयाजीची उभारणी. कोल्हापूर सारख्या शहरात हे भव्य दिव्य हॉटेल ज्या दिमाखात उभी आहे, जो त्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यातून निश्चितपणे कोल्हापूरची प्रतिष्ठा पुढे येते. राजकारणापासून चार हात लांब राहत बंधू सतेज पाटील यांच्या राजकीय नेतृत्वासाठी सदैव तत्पर असणारे संजय पाटील यांनी मुलगा ऋतुराजलाही आमदार केले. सर्वांना मदत करण्याची त्यांची भावना आणि मैत्री जपण्याची त्यांची पद्धत निश्चितच कौतुकास्पद आहे. बालपणापासून त्यांना माणसं जोडण्याचा छंद आहे. त्यामुळे नेहमीच माणसांच्या गराड्यात असणारे संजय पाटील हे कौटुंबिक जबाबदारी साठी तेवढेच तत्पर आहेत.
शिक्षण संस्था उद्योग हे सारे पाहत असताना कौटुंबिक जबाबदारी मात्र तेवढ्याच तत्परतेने ते पाहत असतात. नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत त्यांनी बांधकाम क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या कल्पना राबवल्या. यातूनच तळसंदे शिक्षण संकुल असू दे किंवा कोल्हापुरातील हॉस्पिटल. येथे गेल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येते तीसहून अधिक संस्थांची उभारणी करणारे संजय पाटील अतिशय नम्र आहेत. संयमी आहेत. ज्या व्यक्तींना आपल्या पालकांचा महान वारसा लाभलेला असतो त्यांच्यासाठी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे ही मोठे आव्हान असते. संजय पाटील यांच्या बाबतीत तेच झाले. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांचा पसारा वाढवला तीच परंपरा कायम ठेवत संजय पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. केवळ शिक्षण नव्हे तर सहकार, पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी क्षेत्रात त्यांनी उत्तुंग काम केले.
डॉ. डी वाय पाटील साखर कारखान्याची उभारणी हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. डी वाय पाटील हॉस्पिटल च्या माध्यमातून आरोग्य कारखान्याच्या माध्यमातून सहकार विविध विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करणारे संजय पाटील हे तीन विद्यापीठाचे कुलपती आहेत हा ही दुर्मिळ योगायोग आहे. शून्यातून विश्व निर्मिती करत आपल्या कर्तुत्वाचा आलेख सतत उंचावत ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.