र:
न मागता गावाला 50 लाखाचा निधी देणाऱ्या पी एन साहेबांना विसरू नका , राहुलची जबाबदारी आपली
सातार्डेचे सरपंच दादासाहेब पाटील
यवलूज : न मागता पीएन पाटील साहेबांनी आपल्याला 50 लाखाचा निधी दिला त्यामुळे या साहेबांना विसरून चालणार नाही, राहुलची जबाबदारी आता आपली आहे, त्यामुळे संपूर्ण गावानं राहुल यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपलं कर्तव्य आहे. स्व.आम. पी.एन. पाटील यांनी मतदारसंघातील गावागावांत विकासकामे केली. सातार्डे गावांत लागेल तेवढा निधी दिला. गावाकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहून स्वत: पी.एन. पाटील यांनी बोलावून घेऊन आम्ही रस्तेकामासाठी ५० लाखांचा निधी दिला. ज्या पद्धतीने पी एन पाटील यांनी विकासकामाना गती दिली तिला ताकदीने पुढे नेण्याचे काम राहुल पाटील करतील यात शंका नाही. सातार्डे आणि परिसरातून भरघोस मतांनी राहून पाटील यांना निवडून आणणार असल्याचा विश्वास सरपंच दादासाहेब पाटील यांनी दिला.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पी. पाटील यांच्या सातार्डे (ता.पन्हाळा) येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय मोरे होते. यावेळी राहुल पाटील यांनी यवलूज, पडळ, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे आदी गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी राहुल पी. पाटील म्हणाले, एक दीड महिन्यात मतदारसंघातील गावागावांत हा तिसरा प्रचार दौरा आहे. महाविकास आघाडीची ताकद आपल्यासोबत आहे. लोकसभेप्रमाणे ताकदीने कामाला लागावे. हात चिन्हासमोरचे बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
उबाठाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार म्हणाले, विरोधकांबरोबर आम्ही काम केले आहे. खोटं बोल पण रेटून बोल एवढाच त्यांचा उद्योग आहे. शिवसैनिक फुटल्याचा कांगावा ते करत आहेत. मात्र पन्हाळा तालुक्यातील शिवसैनिक राहुल पाटील यांना आमदार करून गद्दारांना धडा शिकविणार आहे.
दिलीप मिसाळ, विक्रम पवार, संजय मोरे यांची भाषणे झाली. गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, श्रीकांत मोरे, शशिकांत आडनाईक, रणधीर पाटील, निवास पाटील, विलास रामाणे, सुभाष रामाणे, विक्रम पवार, एकनाथ पाटील, मानसिंग पाटील, सागर लाड, विजय पाटील, प्रसाद पाटील, संजय चव्हाण, राजू पाटील, पंडित पवार, नामदेव रामाणे, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : सातार्डे (ता.पन्हाळा) येथील प्रचार दौऱ्यातप्रसंगी उमेदवार राहुल पी. पाटील,सरपंच दादासाहेब पाटील, बाळासाहेब खाडे, संजय मोरे दिलीप मिसाळ, सुरेश पवार, विक्रम पवार व ग्रामस्थ.