*केडीसीमार्फत सभासद संस्थांना २६ कोटी, ६५ लाख रुपये डिव्हीडंड*
*संस्थांच्या खात्यांवर डिव्हीडंड वर्ग*
*कोल्हापूर, दि. १५:*
*कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सभासद संस्थांना २६ कोटी, ६५ लाख रुपये डिव्हीडंड अदा केला आहे. शेअर्स रकमेच्या दहा टक्केप्रमाणे हा डिव्हिडंड वर्ग केल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.*
*याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावांमधील एकूण ११, ६९१ सभासद सहकारी संस्थांना हा डिव्हीडंड वर्ग करण्यात आला. यामध्ये सहकारी साखर कारखाने, प्राथमिक विकास सेवा संस्था, सहकारी दूध संस्था, सहकारी पतसंस्था सहकारी, सहकारी अर्बन बँका, सहकारी सूत गिरण्या, पाणीपुरवठा संस्था, पत संस्था इत्यादी प्रकारच्या संस्था केडीसीसी बँकेच्या सभासद आहेत. शेअर्स भागधारणा पूर्ण केलेल्या सभासद संस्थांना दहा टक्केनुसार हा डिव्हीडंड वर्ग केला आहे. सहकारी संस्थांचे खाते असलेल्या संबंधित शाखांकडे हा डिव्हीडंड वर्ग केला आहे. दरम्यान; ३१ मार्च २०२४ अखेर बँकेकडे या संस्थांचे एकूण शेअर भांडवल २८५ कोटी रुपये आहे.*
………….
============