समस्याग्रस्त आणि समाधान करणाऱ्यांतील दरी कमी करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने पुढे यावे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांचे आवाहन

संजय डी पाटील यांचा झाला सत्यार्थी यांच्या हस्ते गौरव

Spread the news

 

कोल्हापूर

जग गतीमान होत आहे, आधुनिकता येत आहे, जोरात प्रगती होत आहे, संशोधन वाढत आहेत, नाविण्यपूर्ण घटना घडत आहेत.. यापूर्वी कधीच एवढी प्रगती झालेली नाही, अशी प्रगती होत असताना दुसरीकडे मात्र आज कधी नव्हे एवढे जग धोक्यातही आले आहे,ज्याचा मोठा परिणाम समाजजीवनावर होणार आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वसामान्य जनतेनेच पुढे यावे असे आवाहन नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केले.

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित त्यांच्या सत्कार समारंभात डॉ. सत्यार्थी बोलत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी समस्याग्रस्त आणि समाधान करणाऱ्यांमधील अंतर कमी होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील, सौ शांतादेवी डी. पाटील, सौ. सत्यार्थी,  आमदार सतेज पाटील, वैजयंती संजय पाटील, डॉ पी. डी.पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ प्रभात रंजन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही भोसले, डीन डॉ. आर. के. शर्मा,आकुर्डीचे कॅम्पस डायरेक्टर एडमिरल अमित विक्रम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमास  प्रताप चव्हाण पाटील, मेघराज काकडे, देवराज पाटील, सौ. सुप्रियाताई चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, सौ. राजश्री काकडे, श्री भारत पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, सौ पूजा पाटील, सौ वृषाली पाटील यांच्यासह कुटुंबीय, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सत्यार्थी म्ह्णाले, सध्या देशात सत्ताधारी आणि जनता यांच्यातील अंतर वाढत आहे. जनता ही भाऊ, आई, बहिण नव्हे तर केवळ मतदार आहेत, असे पाहणारे सत्ताधिश आहेत. समाधान करायला ज्यांना सत्तेबर बसवले आहे, त्यांच्याकडून समाधान करण्याची नैतिक जबाबदारी कमी होत आहे. शिक्षण हा हक्क आहे, अधिकार आहे हा कायदा आहे. पण, त्याची अमंलबजावणी होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे.  परिस्थिती बदलण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेनेही पुढे यावे, सूर्यकिरणांची वाट न पाहता आपणच ज्योत व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी आमदार सतेज पाटील यांनी स्वागत करताना संजय डी. पाटील यांच्या कतृत्वाचा आढावा घेतला. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच त्यांनी आपले वेगळे जग निर्माण केले, यश मिळवल्याचे स्पष्ट केले. भालबा विभुते यांनी संपादित केलेल्या ध्यासपर्व या संजय पाटील यांच्या गौरव ग्रंथाचे व शिक्षणाविषयीच्या दुसऱ्या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना संजय डी. पाटील म्हणाले, चाळीस वर्षात प्रचंड काम करताना समोर आले ते स्वीकारले. नम्रतेने आणि प्रामाणिकपणे काम केले. कोल्हापुरात लवकरच बिझनेस मॅनेजमेंट स्कूल सुरू करण्याची मोठी इच्छा आहे. कोल्हापूरकरांसाठी जेवढं काही करता आले, ते केलं आणि यापुढेही करत राहीन असेही ते म्ह्णाले. पुणे येथील डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठाचे कुलपती पी.डी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी संजय पाटील यांच्या धाडसी निर्णयाचे आणि कष्टातून मिळविलेल्या यशाचे कौतुक केले.  अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज यांनी संजय डी. पाटील यांच्या शिक्षण, आरोग्य, शेती या सर्व क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!