सुवर्णमहोत्सवी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 27 ते 30 जून, 2024 या कालावधीत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
कोल्हापूर, प्रतिनिधी सुवर्णमहोत्सवी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 27 ते 30 जून, 2024 या कालावधीत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावर्षी 180 पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. कोल्हापुरातील सुप्रसिद्ध शिरगावकर ग्रुप या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. तसेच कॅस्प्रो ग्रुपचे प्रकाश राठोड आणि मिराशा शेपर्सचे आदित्य शहा यांचंही या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे.
कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची पन्नास वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे, श्रीमंत हिम्मतसिंह घाटगे, श्रीमंत विक्रमसिंह घाटगे, बाबा भोसले, मेजर पी वाय सोवनी, सरदार मोमीन यांनी बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना केली. या कामात मुंबईचे नारायणदास रुपारेल, सुशीलकुमार रुईया, पुण्याचे अण्णासाहेब आणि दाजीसाहेब नातू यांनी मोलाची साथ दिली. या सर्वांच्या सहयोगामुळे कोल्हापुरात बॅडमिंटन खेळ रुजला. कोल्हापूर शहरातील अलंकार हॉल आणि कपिलतीर्थ मार्केटमध्येच बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध होती.
असोसिएशनच्या स्थापनेनंतर कोल्हापुरात सातत्याने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा झाल्या. प्रकाश पदुकोण यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या खेळाडूंनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत कोल्हापुरात खेळ केला आहे.
स्थानिक खेळाडू इकबाल मैंदर्गी, सुरेश नाडगोंडे, वर्षा नाडगोंडे, सरोज रासम, वैशाली आगाशे, प्रेरणा आळवेकर, ऋचा आळवेकर, यांच्यासह मयूर तावडे, विनोद भोसले असे अनेक नामवंत खेळाडू असोसिएशनने दिले. शिवाय सुरेखा सरदेसाई, डॉ. रवी पाटील, डॉ. रमेश देसाई, अरुण चिटणीस, दिलीप चिटणीस, माणिकताई देवधर, अभिमन्यू भणगे, निनाद कामत, केदार नाडगोंडे, तन्मय करमरकर, जान्हवी कानिटकर, राहुल काणे, पौरस कुलकर्णी, अरुणा सापळे (रसाळ) या खेळाडूंनीही राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा गाजवल्या आहेत. अलीकडच्या काळात विद्या पाटील, दाक्षायिणी पाटील, रुतिका कांबळे, आरती पाटील या नवीन खेळाडू उदयाला आल्या आहेत.
कोल्हापुरात खेळलेल्या खेळाडूंपैकी शोभा मूर्ती यांना अर्जुन पुरस्काराने तर मयूर तावडे यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने खेळाडू तयार होत आहेत. कोल्हापूर आता विविध मार्गाने देशातील अनेक शहरांशी जोडले गेले आहे. त्यामुळे भविष्यात येथे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू येऊ शकतात. एके ठिकाणी किमान चार ते सहा कोर्ट्स असतील तर खेळाडूंना सराव करणे सोयीचे होईल. यातूनच उद्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतात. यासाठी सरकारी पातळीवर तसेच कॉर्पोरेट्सनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन स्थानिक प्रशासनाच्या सहयोगाने या सुविधा खेळाडूंना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या पत्रकार परिषदेवेळी असोसिएशनचे प्रेसिडेंट सतीश घाटगे, सेक्रेटरी वर्षादेवी नाडगोंडे, जॉईंट सेक्रेटरी विनोद भोसले, ट्रेझरर चंद्रशेखर सोवनी व बॅडमिंटन असोसिएशनचे इतर संचालक व स्पर्धा समितीचे सदस्य उपस्थित होते..