जिल्हा परिषदेत आदर्श गोठा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न…
जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान…
कोल्हापूर प्रतिनिधी :…
शेती करत असताना त्यामध्ये नव नवीन पद्धतींचा अवलंब करून शेती समृध्द करण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माजी मुख्यमंत्री व हरित क्रांती चे प्रणेते कै . वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दीन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे हे होते.
जिल्हा परिषद पशू संवर्धन व कृषि विभाग , करवीर पंचायत समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा मध्ये आदर्श गोठा पुरस्कारांचे वितरण व शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ प्रशस्ती पत्र व रोप देऊन उपस्थिती असलेल्या विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद सी ई ओ कर्तिकियन एस हे होते .
वसंतराव नाईक यांचा प्रतीमचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा पशू संवर्धन अधिकारि डॉ प्रमोद बाबर यांनी पशुपालन व्यवसाय साठी पशू धनांची निवड,निगा , लसीकरण, सकस आहार, मिल्किंग मशीनचा वापर, मूरघास या विषयी माहिती देत मोलाचं मार्गदर्शन केले.
शेंडा पार्क येथील संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ अशोकराव पिसाळ यांनी ऊस पीक व्यवस्थापनाबाबत माहिती दिली . यानंतर मधू मक्षिका पालन यावर कीटक शास्त्र विभागाचे सा. प्रा. डॉ अभय कुमार बागडे यांनी मार्गदर्शन केले.
माती परीक्षणावर मोहीम अधिकारि तानाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी कृषि विभागातील विविध योजनांची माहिती देऊन एक रुपया पीक विमा योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि प कृषि अधिकारी गौरी मठपती यांनी केले. स्वागत आणि प्रास्तावीक ए वाय चव्हाण यांनी केले.
यावेळी स्वागत पर सुरेख रांगोळी रेखंटण्यात आली होती .
कार्यक्रमात केरबा माने कौलगे,तालुका कागल, सुमित्रा पाटील बसरेवाडी तालुका भुदरगड, नंदकुमार साळोखे, टोप तालुका हातकणंगले, कलगोंडा टेळे सुळकुड तालुका कागल, शरद देवेकर बसरे वाडी भुदरगड व अजित सौदे वसगडे तालुका करवीर
आदर्श गोठा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची नावे खालील प्रमाणे
गुरुनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, धनाजी पाटील,संदीप सरनोबत सचिन मोरे, गुरुनाथ गमाजगोळ,प्रकाश महाडिक, सुमित परिट, बाबासो पाटील, बजरंग आंबेकर, आशविनी चौगुले,मीना कुटे.