जिल्हा बँकेचा उच्चांकी 204 कोटीचा नफा चेअरमन हसन मुश्रीफ यांनी केल्या अनेक नव्या घोषणा

Spread the news

जिल्हा बँकेचा उच्चांकी 204 कोटीचा नफा

 

चेअरमन हसन मुश्रीफ यांनी केल्या अनेक नव्या घोषणा

कोल्हापूर, प्रतिनिधी,

प्रशासकांची कारकिर्द जाऊन नऊ वर्षापूर्वी संचालक मंडळाने कार्यभार हातात घेतल्यानंतर या कोल्हापूर जिल्हा बँकेने गरुडझेप घेतली आहे. ३१ मार्च २०१५ अखेर बँकेकडे रू. २, ८९० कोटींच्या ठेवी होत्या, त्या आता रु. ९०४४  कोटी झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षात बँकेने सर्वच आर्थिक निकषात मोठी प्रगती केली आहे. प्रशासक काळातील रू. १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून अहवाल सालात बँकेने उच्चांकी असा रू. २०४ कोटी, ५६ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविलेला आहे. यामुळे शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी दिली. बँकेच्या नवीन इमारतीचे लवकरच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले, प्रशासक असतानाची कर्जे रु.२, १६७ कोटीवरून रु. ६,९७७ कोटींवर आलेली आहेत. त्यावेळी रु. १४६ कोटीचे वसूल भागभांडवल आज रु. २८६  कोटींवर पोहोचले आहे. नेटवर्थही रु.१११ कोटींवरून रु. ९८५ कोटींवर पोहोचले आहे. संचालक मंडळानेही अत्यंत काटकसरीचा कारभार केला आहे. आजघडीला सर्वच म्हणजेच १९१ शाखा नफ्यात आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद आहेत. सीआरएआर ९% राखणे आवश्यक असतांना बँकेने तो १४. ३५ % राखला आहे. बँकेचा प्रतिकर्मचारी व्यवसाय रु. २.७६ कोटीवरून रु. ११ कोटी, ९२ लाखांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, प्रतीशाखा सरासरी वार्षिक उलाढाल रु. २६ कोटीवरून रु. ८४ कोटींवर पोहोचली आहे. प्रशासक काळातील रू. १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून अहवाल सालात बँकेने उच्चांकी असा रू. २०४ कोटी, ५६ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविलेला आहे.

 

 

बँकेच्या नवीन इमारतीचे लवकरच केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे सांगून यावेळी त्यांच्याकडे विविध मागण्या करण्यात येणार असल्याचे सांगताना मुश्रीफ म्ह्णाले,  केंद्र सरकारच्या कृषी कर्जमाफी व सवलत योजना २००८ मध्ये , कोल्हापूर जिल्ह्यातील ४४, ६५९ शेतकऱ्यांची रू. ११३ कोटींची रक्कम नाबार्डने अपात्र ठरविली. या विरोधात बँकेच्या सहयोगाने शेतकरी उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने ही कर्जमाफी पात्र ठरविली. दरम्यान;  अपात्र कर्जमाफीमध्ये नाबार्डने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपील माघार घ्यावे. दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या काळातील रु. २५ कोटी, २७ लाखांच्या नोटा बँकेकडे शिल्लक आहेत. त्या बदलून मिळाव्यात. बँकेच्या शाखांची संख्या वाढविण्याची मागणी आम्ही केलेली आहे. त्यांनी रिझर्व बँकेला तशा सूचना द्याव्यात.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ,  उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे,  माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,  माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, आदी संचालक व*केडीसीसी बँकेचे बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ,  उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,  आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.*

या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले, शेतकरी संघटनेचे प्रा. जालिंदर पाटील, वसंतराव देसाई, निवास बेलेकर, नामदेवराव मेंडके, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब खाडे, जयसिंगराव भोसले, तोहीन शिकलगार, अशोकराव फराकटे, राजेंद्र माने, रवींद्र जानकर, अमरसिंह पाटील, शिवपुत्र तेली यांनी प्रश्न विचारले.

 

 

 

बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन मुश्रीफ यांनी मांडलेले मुद्दे

 

□ सभासद भाग भांडवल :

आजअखेर एकूण सभासद १३,७६१ इतके आहेत. अहवाल सालात भाग भांडवलामध्ये रु.२१.१६ कोटींनी वाढ झाली असून बँकेचे एकूण वसुल भागभांडवल रु.२८५.७२ कोटी इतके झाले आहे. बँकेचा एकूण निधी रु. ८१५.३२ कोटी इतका असून स्वभांडवल रु.११०१.०४ कोटी झालेले आहे.

 

□ ठेवी :

अहवाल वर्षाच्या सुरुवातीस बँकेकडे रु.८०९२.६५ कोटी इतक्या ठेवी होत्या. यामध्ये रु.९५२.२६ कोटी ठेवींची वाढ होऊन अहवाल वर्षाअखेर संस्था ठेवी रु.४४३०.८२ कोटी तर व्यक्ती ठेवी रु.४६१४.०९ कोटी अशा एकूण रु.९०४४.९१ कोटी इतक्या ठेवी आहेत. यापैकी, कासा ठेवी रु. ३६४४.३२ कोटी इतक्या असून त्याचे शेकडा प्रमाण ४०.२९% आहे. तर, मुदतबंद ठेवी रु.५४००.५९ कोटी इतक्या असून त्याचे शेकडा प्रमाण ५९.७१% इतके आहे. मा. संचालक मंडळ, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रयत्नातून बँकेने दिलेल्या ठेवीच्या उद्दिष्टांशी शेकडा ९५.२१% इतकी पूर्तता केलेली आहे. ग्राहकांच्या ठेवींच्या सुरक्षिततेसाठी बँकेने डिपॉझीट इन्शुरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनकडे ठेवीदारांच्या रु.५.०० लाख पर्यंतच्या ठेव रक्कमेचा विमा उतरलेला आहे. बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रु.१०,५००/- कोटी ठेवीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

 

□ क्यू आर कोड:

व्यापारी, दुकानदार व्यावसायिक व उद्योजक अशा ग्राहकांना त्यांच्या कामाच्या व्यापातून दररोज बँकेकडे येणे शक्य नसते. अशा ग्राहकांना क्यु. आर. कोडच्या माध्यमातून बँकेशी जोडण्यासाठी बँकेने दि. ०१-०६-२०२४ पासून क्यु. आर. कोड प्रणाली कार्यान्वित केली आहे.

 

क्यू. आर. कोडच्या माध्यमातून पिग्मी एजंटशिवाय दररोज जमा होणाऱ्या रकमेतून ग्राहकाच्या मागणीनुसार ठराविक रक्कम ‘पिग्मी (अल्प बचत) ठेव’ योजनेत जमा करता येणार आहे. सदर ठेवीची मुदत १ वर्षाची असून त्यावर व्याजदर द. सा. द. शे. ४% दिला जाणार आहे. सदर ठेवीच्या तारणावर ६% इतक्या अल्पदराने जमा रकमेच्या ८५% इतपत कर्ज दिले जाईल. सदर योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून व्यावसायिक ग्राहकांनी व्यवसाय वाढीसाठी त्याचा लाभ घ्यावा.

 

□ गुंतवणूक:

रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांचे मार्गदर्शक तत्त्वानुसार बँकेने सी. आर. आर. व एस. एल. आर. साठी करावयाच्या गुंतवणूका योग्यरित्या केलेल्या आहेत. बँकेची एकूण गुंतवणूक रु. ३७९१.२६ कोटीची आहे. सन २०२३-२४ आर्थिक वर्षामध्ये बँकेने कर्जरोखे / बाँड खरेदी विक्री व्यवहारातून रु. २.९४ कोटी इतका नफा कमविला आहे.

 

□ शेती अल्प मुदत कर्जे :

अहवाल सालात १, ८२७ संस्थांची क. म. पत्रके बँकेकडे मंजुरीसाठी प्राप्त झालेली होती. सदर संस्थांना अहवाल सालात रु. ३१७२.८१ कोटींच्या पीक कर्ज मर्यादा मंजूर केलेल्या आहेत. मा. जिल्हास्तरीय/राज्यस्तरीय तज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार शेतकरी सभासदांना अल्पमुदत पीक तसेच पशुसंवर्धन/मत्स्यव्यवसायासाठी खेळते भांडवल कर्ज पुरवठा केलेला आहे.

□ शेती मुदती कर्जे :

बँकेने अहवाल सालात पीक कर्जाबरोबरच शेतकरी सभासदांना मुदती कर्ज पुरवठा केलेला आहे. सदरचा कर्ज पुरवठा अधिक सुलभ होण्यासाठी मुदती कर्ज धोरणामध्ये बदल करणेत आलेले आहेत. अहवाल सालात बँकेने प्राथमिक शेती संस्थांमार्फत शेतकरी सभासदांना रु. २१८.६६ कोटीचे मुदती कर्ज वाटप अल्प व्याजदराने केलेले आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केवळ पीक कर्जाइतपत मर्यादित न ठेवता त्यांना विविध प्रकारचा शेती/शेतीपूरक मुदती कर्ज पुरवठा केलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्व गरजा विचारात घेऊन कृषी यांत्रिकीकरण, सिंचन योजना, जमीन सुधारणा, शेतघर/ गोठा बांधकाम, फळबाग लागवड, पुनर्गठण, किसान सहाय्य, शेतीपूरक, इतर प्राधान्य क्षेत्र, प्रकल्प कर्ज, बिगरशेती, अनिष्ट तफावत हप्ते बांधणी अशा विविध कर्ज धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे.

 

अहवालसालात आपल्या बँकेस  रु. २,७३६  कोटी पीक कर्ज इष्टांकापैकी  रु. २, ११२ कोटी कर्ज वितरण करुन ७७ % पूर्तता केली आहे. जिल्हयातील एकूण ३२ राष्ट्रियकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा बँक यांनी रु.२,९७१ कोटीचे पीक कर्ज वितरण केले आहे. या कर्जामध्ये एकट्या आपल्या बँकेचा हिस्सा तब्बल ७१ %  आहे.  मात्र;  जिल्हयामध्ये या सर्व बँकांकडील ठेवी रु. ४६, २९८ कोटी आहेत. त्यापैकी आपल्या बँकेकडे केवळ रु. ९, ०४४ कोटी आहेत

□ बिगर शेती कर्जांमध्ये सूतगिरण्या, साखर कारखान्यांसह लघु व मध्यम उद्योगांनाही प्रकल्प कर्ज पुरवठा……..

● बँकेच्या बिगरशेती कर्ज विभागातील सी. एम. ए.  सेल अंतर्गत प्रामुख्याने पाच कोटीपेक्षा जादा रकमेची कर्जे मंजुरी केली जातात. यामध्ये प्रामुख्याने साखर कारखाने, सूत गिरण्या, प्रक्रिया संस्था व खरेदी विक्री संघ अशा संस्थांचा समावेश आहे. या विभागाकडून गेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच सन २०२२- २३ मध्ये केलेल्या कर्जपुरवठ्यापेक्षा या आर्थिक वर्षांमध्ये सन २०२३-२४ मध्ये झालेल्या कर्जपुरवठ्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या नफा वाढीमध्ये झालेला आहे.

 

 

□ भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्यावतीने विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. विकास सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा प्रकल्प वेगवान गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्याच टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १, ९०६ संस्थापैकी १७५१ विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचे कामकाज गतीने चालू आहे.

 

□ केंद्र शासन पुरस्कृत रूपे के. सी. सी. कार्ड योजनेअंतर्गत बँकेने प्राथमिक सेवा संस्थांच्या माध्यमातून २, ९०, ९३७ पात्र शेतकरी सभासदांना रुपे के. सी. सी.  कार्डांचे शाखा स्तरावर मागणीप्रमाणे त्वरित वितरण केले जात आहे. जिल्ह्यातील रुपे के. सी. सी. कार्डधारकांना रू. ३, १७३ कोटी पीक कर्ज मर्यादेच्या मंजुरीपोटी रू. २, ११२ कोटी इतक्या रकमेचे पीक कर्ज वाटप केले आहे. आर्थिक वर्षांमध्ये ९, ९८० के. सी. सी.  कार्डधारकांना इन्स्टा कार्ड वितरित केले आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”  जाहीर केली. या योजनेतील जिल्हाभरातील तब्बल एक लाखाहून अधिक माता- भगिनींचे ३० कोटीहून अधिक रुपयांचे अनुदान केवळ एकट्या आपल्या बँकेच्या माध्यमातून जमा झालेले आहे.

 

 

 

● ठेवी : १०, ५०० कोटी

 

●कर्जवाटप :  ७, ५०० कोटी

 

●गुंतवणूक : ४, ००० कोटी

 

●नेट एनपीए: शून्य टक्के

 

●ढोबळ नफा: ३०० कोटी

 

●सीआरएआर: १५ %

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!