महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा

Spread the news

महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाच देण्याचा प्रयत्न

प्रणिती शिंदे यांचा आरोप

पैसे नको सुरक्षितता द्या

उजळवाडीत सभा

कोल्हापूर
लाडकी बहिणीचे पैसे घेतले आणि काँग्रेसच्या प्रचाराला गेल्यास त्या महिलांचे फोटो काढून आम्हाला द्या अशी भाषा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे, व्यवस्था करतो ही कसली भाषा? असा संतप्त सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाच देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडून करण्यात येत आहे, महिलांना आर्थिक आमिषा ऐवजी आपल्याला सुरक्षितता आणि आत्मसन्मान देण्याची गरज आहे असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उजळाईवाडीत दुर्गाशक्ती महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात त्या बोलत होत्या. खासदार शिंदे म्हणाल्या, कोरोना काळात सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी केलेले काम तसेच ग्रामीण आणि शहरातील विविध प्रकल्प राबवून मतदारांनी निस्वार्थीपणे केलेले योगदान कौतुकास्पद आहे. महिलांचा सन्मान सुरक्षितता आणि सशक्त सशक्तिकरण यावर लक्ष केंद्रित करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे.

ऋतुराज पाटील यांनी महिलांसाठी महालक्ष्मी योजना मोफत बस प्रवास योजना या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

आज आजपर्यंतच्या इतिहासात महिलांची एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिली ही गर्दी आमदार पाटील यांच्या विजयाची साक्ष देत आहे ऋतुराज यांच्यासारख्या कार्यक्षम तरुण आमदार आपल्याला लाभला आहे विधानसभेच्या लॉबीमध्येही कर्मचाऱ्यांची विचारपूस करणारा हा एकमेव आमदार असल्याचे गौरवद्गार प्रणिती शिंदे यांनी काढले.

यावेळी पूजा ऋतुराज पाटील, देवश्री सतेज पाटील, प्रतिभा पवार, सारिका माने, शुभांगी अडसूळ, संदीप माने, प्रतिभा पवार, सारिका माने , सोनाली मजगे, भाग्यश्री पारखे उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!