- *महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या संचालक मंडळावर कोल्हापूर जिल्ह्यातून 7 जण बिनविरोध*
*पश्चिम महाराष्ट्र विभागातुन उपाध्यक्षपदी रमाकांत मालू बिनविरोध*
मुंबई ः महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषि, सेवा उद्योग क्षेत्रांची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅगीकल्चर च्या संचालक मंडळाच्या 2024-26 साठीच्या द्वैवार्षिक निवडणूकीत कोल्हापूर जिल्ह्यातुन सात जणांची व पश्चिम महाराष्ट्रातील उपाध्यक्ष पदावर कोल्हापूर जिल्ह्यातील रमाकांत मालू यांची बिनविरोध निवड झाल्याची माहीती या निवडणूकीतील संस्थापक शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेल चे प्रमुख व चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी जे.के.पाटील यांच्या सहीने प्रसिध्द केलेल्या यादीनुसार उपाध्यक्षपदी रमाकांत मालु व संचालक मंडळ सदस्यपदी भरत जाधव, राजाराम पाटील, धैर्यशील पाटील, अश्विनी दानीगोंड, जितेंद्र शहा, नितीन धुत, नंदकुमार शहा यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी तसेच नाशिक, मराठवाडा व कोकण या तीन विभागातुन उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रकिया सुरू असुन येत्या 10,11, व 12 जून रोजी मतदान प्रकिया संपन्न होणार असल्याचे सांगुन पश्चिम महाराष्ट्रातील रविंद्र माणगावे हे वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी लढत असल्याची माहीतीही ललित गांधी यांनी दिली.
राज्याच्या विविध विभागातील संचालक मंडळाच्या 89 जागांपैकी ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे 75 उमेदवार व तीन उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याने ललित गांधी यांनी एकतर्फी सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.
उर्वरीत जागांच्या मतदानानंतर 14 तारखेला मतमोजणी होऊन त्यादिवशी संपूर्ण निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.