सिमंदर कोविड सेंटर तर्फे डिजिटल एक्स-रे युनिटची भेट

Spread the news

सिमंदर कोविड सेंटर तर्फे डिजिटल एक्स-रे युनिटची भेट

कोल्हापूर,ता.२:प्रतिभा नगर येथील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्र येथे सिमंदर कोविड सेंटर तर्फे डिजिटल एक्स रे युनिट भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य साध्वीजी श्रीश्रेयांसप्रभाश्रीजी यांनी मांगलिक म्हणून सिमंदर कोविड सेंटरच्या डिजिटल एक्स रे युनिटचे उद्घाटन केले.

याप्रसंगी वासूपूज्य स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जवाहर गांधी व इतर ट्रस्टी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सिमंदर कोविड सेंटरचे भरत ओसवाल,हिम्मत राठोड, कुमार राठोड, जितूभाई गांधी,प्रकाश राठोड,प्रवीण ओसवाल,राजू कटारिया, भरत तेजमल ओसवाल यांचे सहकार्य लाभले.

डॉ. निरंजन राठोड, डॉ.विश्राम मेहता,डॉ.महेंद्र ओसवाल, डॉ.अक्षय बाफना व श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्राचे अध्यक्ष संजय शहा,किरण पोरवाल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भानमल ओसवाल यांनी केले.

फोटो ओळ.कोल्हापूर: प्रतिभानगर येथील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्रात डिजीटल एक्स रे युनिटच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!