धनगर समाजाच्या राज्य कार्यकारिणीवर स्नेहल सरगर
कोल्हापूर
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी कोल्हापूर येथील स्नेहल सरगर यांची निवड निवड करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून त्या धनगर समाजाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व अधिक व्यापक त्याने कार्य करण्यासाठी त्यांना राज्यकारण कार्यकारणीवर संधी देण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सरगर यांना निवडीचे पत्र दिले आहे.