Spread the news

कणखर नेतृत्व.. शिखरे पार करणारे कर्तृत्व : धनंजय महाडिक

 

 

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेले वीस वर्षे सतत झटत असलेल्या आणि आपल्या कामाने प्रभावी नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांचा 15 जानेवारीला वाढदिवस. सर्वांगीण नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे खासदार धनंजय महाडिक.

  •  

वीस वर्षांपूर्वी राजकारणात आलेल्या महाडिक यांनी कोल्हापूरचा चेहरा बदलण्यासाठी प्रचंड प्रयत्न केला विमानतळ रेल्वे स्थानक येथे जाऊन पाहिलं तर त्यांच्या कर्तृत्वाची झलक पाहायला मिळते महापूर कोरोना किंवा कोणती संकट असो सर्वांच्या मदतीला धावून येणारा नेता हीच त्यांची प्रतिमा आहे प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेऊन त्याचा पाठपुरावा करत परिपूर्ती करणारा हा नेता आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी कोट्यावधी निधी आणून त्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा क्रांत्रीकारक यशस्वी प्रयोग केला. स्थानकाचे सौंदर्य वाढवत कोल्हापूरच्या संपन्नतेत मोलाचा वाटा उचलला आहे.

प्लॅट फॉर्म क्र. दोन वरुन चार कडे जाण्यासाठी ब्रीज आणि इलेव्हेटर तसेच लिफ्टच्या कामाचा समावेश आहे. मुख्य प्रवेशद्वार डोळ्याचे पारणे फेडते. तिकीट बुकिंग, प्रतीक्षालय, स्वतंत्र बंदिस्त पार्किंग, दिव्यांगजन अनुकूल सुविधा मनाला आनंद देणाऱ्या आहेत.

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची सेवा कोल्हापूरकरांना मिळणार आहे. त्यांच्या अथक प्रयत्नाने मिरज ने कोल्हापूर रेल्वे मागाचे दुहेरीकरण लवकरच आकाराला येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे सह‌कारी असलेले खासदार धनंजय महाडिक यांच्या कल्पनेतून कोल्हापूर पुणे वंदे भारतचा शुभारंभ माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते पार पडला आहे.

कोल्हापूर जिल्हातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाला केंद्र शासनाने मंजुरी दिल्याने खासदार महाडिक यांच्चा पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सध्या ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गड़करी यांचेकडून शिरोली जकात नाका ते कावळा नाका, दाभोळकर कॉनर ने दसरा चौक, शिवाजीपूल असा चार उड्डाण पुलाच्या कामाच्या पाठपुराव्यास झटत आहेत. खासदार महाडिक यांचा अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प आहे.

‘ए. आय आणि आयटी

येणाऱ्या काळात एआयवर आधारित सॉफ्टवेअरला मागणी वाढणार आहे: आयटी इंडस्ट्रिज चौपट वाढण्याचा अंदाज आहे: हॉस्पिटल्स, फाउंड्री, इंडास्टेज, कारखान्यांना सॉफ्टवेअर तयार केली आहेत. कोल्हापूरात 350 पेक्षा जास्त आयटी कंपन्या आहेत. यातील ५० रखके सॉफ्टवेअर प्रॉडक्टस् आहेत. ल
कोल्हापूरात ‘आयटी’ हब झाल्यास सुमारे पन्नास हजार इंजिनियरना रोजगार प्राप्त होईत, कोलापूरातील सुमारे अडीच लाख आयटी तज्ज्ञ जगभरात आहेत. यांच्या सहकार्याने आणि शासनाच्या मदतीने अत्यंत आधुनिक आयटी हब उभा करण्याचा मानस आहे. तो लवकरच शेंडा पार्क येथे आकाराला येण्याच्या मार्गावर मागविर आहे.

सत्ता असो वा नसो आपल्या मातृभूमीतील लोकोसाठी सतत कोणताही अंहकार न करता, विरोधका बद्दल द्वेष, मत्सर न करता अत्यंत संयमाने, शांतपणे, असंख्य सामाजिक अक्रम राबवत, समाजातील सर्व दुःखात पुढे होवून आत्मसमर्पण भावनेनेच एखादया थोर योद्धाप्रमाणे, अविचल कर्मयोग्या प्रमाणे खासदार धनंजय महाडिक असंख्य कामात दिवसरात्र व्यस्त असतात. अखंड कामातून यांच्या देहबोलीतून एक महानेतेची झलक प्रकाशमान होत राह‌ते.

 

कोणत्याही नेत्याकडे केवळ डोळे असून उपयोग नाही, तर दृष्टी असणे आवश्यक आहे, राजर्षी शाहू छत्रपतींकडे ती होती. म्हणून शाहूपुरी, मार्केट यार्ड, जयसिंगपूर यासारख्या बाजारपेग उभ्या राहिल्या. कोल्हापूरात रेल्वे आली. शेती साठी धरणे बांधली, कोल्हापूर संपन्न झाले. पण पुढील काळात प्रचंड क्षमता असूनही खूप मागे पडलो, आज देश, महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर वेगाने होतो आहे, आज पहिल्या दहा शहरांमध्ये आपला क्रमांक शोधायची वेळ आली आहे. ही स्थिती कोणामुळे निर्माण झाली. ही स्थिती बदलण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्राचा विकास ही कल्पना मांडून २० वर्षे झाली. शहराची थेट पाईपलाईन 40 वर्षे झाली, अजूनही व्यवस्थित पाणी पिण्यास नागरिकांना भेटत नाही ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूख्या औद्योगिक विकासासाठी तीन वसाहती झाल्या. पण फार पुढे जाता आले नाही. असलेला विमानतळ बंद पडला होता आणि कोल्हापूरची विकासाची रेल्वे पुढे धावली नाही. आयटी पार्क आहे तसा उदास राहिला. प्रदुर्षणाने आणि गर्दीने श्वास कोंडला. अशा भिषण परिस्थितीत सर्व पातळीवर काही तरी विधायक घडावे म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अग्रक्रमांकाने खासदार महाडिक. यांचे नांव सर्व जनतेच्या मुखात येते कारण खासदार महाडिक.

गेली वर्षे कोल्हापूरच्या विकासासाठी नियोजनपूर्वक कर्मयोगी होत एक एक पाऊल पुढे टाकत चाललेले ठळकपणे दिसतात.

कोल्हापूरचे विमानतळ आधुनिक सुविधंनी सज्ज करीत भारतातील प्रमुख शहरांना जोडण्याचे फार मोठे काम यांच्या हातून घडले आहे. जगाच्या हवाई नकाशावर आज कोल्हापूर दिमाखात उभे आहे. ते महाडिक यांनी घेतलेल्या अविश्रांत कष्टाने !! कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाबरोबर धार्मिक स्थळे, निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग कोकण आणि महाराष्ट्रासाठी मोठा वरदान ठरणार आहे आहे.

खासदार महाडिक यांच्या प्रयत्नाने रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आर्थिक निधी मंजूर केल्याने हा प्रकल्प पूर्ण त्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे.

 

खासदार धनंजय महाडिक यांच्या जिव्हाळ्याचा विषय महालक्ष्मी आणि श्री जोतिबा मंदिराचा सर्वांगिण विकास करण्याचा आहे. सोन्याची पालखी ते सोनेरी मंदीर या दूरदृष्टीतून एक हजार कोटीचा आराखडा आकाराला येत आहे. सध्या 68 कोटीच्या या आराखडयाला सरकारने मंजुरी दिली आहे.

 

कोल्हापूरच्या हवाई दुनियेला जगाला जोडणारा हा कर्तबगार खासदार म्हणजे करवीर नगरीला पडलेले सुंदर स्वप्न आहे. त्यांचा आज वाढदिवस म्हणजे कर्मयोगी माणसांचा जानंद उत्सव आहे. उज्जवल भवितव्य असलेला लोककल्याणारी कार्याचा उत्तुंग हिमालय आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.

प्रा. अशोक पाटील


Spread the news

You may also like

error: Content is protected !!