बारा बलुतेदारांचा विकास हेच शाहू छत्रपतींचे ध्येय
मधुरिमाराजे
कोल्हापुरातील रविवार पेठ भागात प्रचार दौरा;
नागरिक, मंडळांचा उदंड प्रतिसाद
कोल्हापूर : बारा बलुतेदारांना सन्मान आणि जातीय द्वेष संपवण्यासाठी शाहू महाराजांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवावे असे आवाहन सौ मधुरिमाराजे छत्रपती यांनी रविवार पेठेतील प्रचार फेरीत केले.
कोल्हापुरातील रविवार पेठ भागात शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी विविध समाज, तरूण मंडळे आणि माजी नगरसेवकांच्या घरी बैठका घेऊन मधुरिमाराजे यांनी शाहू छत्रपती आणि छत्रपती घराण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर निलोफर आजरेकर, अश्किन आजरेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर, जैबून सय्यद, राजू यादव उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशांत खाडे यांच्या घरी सौंदत्तीच्या मानाच्या जगाचे दर्शन घेतले. यानंतर निलोफर आजरेकर यांच्या घरी भेट दिली. तसेच जय शिवराय तरूण मंडळ, बागवान समाज हॉल, तडाका तरूण मंडळ, शिवगर्जना ग्रुप, सोनटक्के तालीम, न्यू स्टार फ्रेंड्स सर्कल, दिलीप पचिंद्रे तरूण मंडळ, तडखा मित्र मंडळ या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.
यावेळी मधुरिमाराजे म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांनी 12 बलुतेदारांना हक्काचे व्यवसाय जोपासण्यासाठी चालना दिली आणि त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवून दिली. हेच कार्यपुढे नेऊन बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे शाहू छत्रपतींचे ध्येय आहे. जातीय द्वेष पसरवण्याचे काम काही शक्ती करीत आहेत. त्यामध्ये बहुजन समाज भरडला जात आहे. हे संकट रोखण्याचे काम शाहू छत्रपती नक्की करतील.
यावेळी मुनेर महात, रतन हुलस्वार, विनायक खाडे, प्रशांत भोसले, प्रवीण सोनवणे, संजय कदम, सुमित पवार, जय शिवराय तरूण मंडळ, मधुकर शिंदे आदी उपस्थित होते.
…..
*जिल्ह्याचा पुढील 50 वर्षांचा सर्वंकष विकास आराखडा तयार*
संयोगिताराजे
शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ शास्त्रीनगर, जवाहरनगर परिसरात जनतेशी सुसंवाद, बैठका, पदयात्रा
कोल्हापूर : पुढील 50 वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाचा आराखडा संभाजीराजे छत्रपती यांनी तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यावर आम्ही यापुढे भर देणार आहोत. या कार्याला चालना मिळण्यासाठी शाहू छत्रपती यांना दिल्लीला पाठवूया, असे प्रतिपादन संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
संयोगिताराजे छत्रपती यांनी शास्त्रीनगर, जवाहरनगर भागातील शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. यावेळी त्यांच्यासोबत या भागातील माजी नगरसेवक नियाज खान आणि त्यांचे कुटुंबीय होते.
सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन वाटचाल करणारे शाहू महाराज यांना खासदारपदी विराजमान करूया, असे आवाहन नियाज खान यांनी केले.
संयोगिताराजे यांनी तेथील मुस्लिम समाजातील महिलांची भेट घेतली, तेव्हा या महिलांनी आम्ही महाराजांनाच मत द्यायचं हे आधीच ठरवलयं, असे सांगितले. यावेळी आशिष माने, ऋतुजा चव्हाण, नृसिंह देशपांडे, ज्योती माने, नयना माने, स्वप्निल माने, शीतल माने, वरूण माने, गौरी माने, श्रीलेखा माने, भारती सनगर, वंदना देसाई, सागरिका सूर्यवंशी, रवी माने आदी उपस्थित होते.
जयंती अपार्टमेंट, स्नेहल पार्क यासह विविध भागात जाऊन संयोगिता राजे यांनी महिलांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनासह विकासच्या दृष्टीने करण्यासारखे भरपूर आहे. पण इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते झालेले नाही. शाहू महाराज ते नक्की करतील आणि ते भावी पिढीसाठी उपयुक्त असेल असे सांगितले.
यावेळी शेखर खानविलकर, धनश्री खानविलकर, सुधीर तडवळकर, सहदेव चव्हाण, रवींद्र कानगो, निशा तडवळकर, प्रशांत पवार, उर्मिला खाडे, शितल खाडे, प्रियांका संघवी आदी उपस्थित होते.