उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये; आमदार सतेज पाटील..

Spread the news

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये;

आमदार सतेज पाटील..”

, कोल्हापूर

मराठा आरक्षणाच्या मागणी करिता आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना, मराठा समाजातील लोकांच्यावर झालेला लाठीमार आणि गोळीबार मराठा समाज विसरलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची उद्या शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी गांधी मैदान या ठिकाणी सभा होत आहे. या ठिकाणी आज आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मराठा समाज महायुतीच्या बाजूने उभा राहील. असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी उपोषण बसले होते. त्यावेळी, पोलिसांनी केलेला लाठीमार आणि गोळीबार कोणी केला, हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळ राज्यातला मराठा समाज महायुतीला सहकार्य करणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, विधानसभा प्रचाराकरिता राज्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅग तपासल्या गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हा केवळ दिखावा असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही कसे निष्पक्ष आहोत हे दाखवण्याचां हा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही, त्यांनी केली.

बटेंगे तो कटेंगे…एक है तो सेफ है असे.मुद्दे महायुती सरकारकडून जनतेला गृहीत धरून, असं वक्तव्य करत असेल तर जनताच त्यांना जागा दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी दिला. जनता मतदान करणारं आहे. आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होईल. असंही त्यांनी सांगितल.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!