कोल्हापूर दि.16
स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांच्या महाविजयासाठी दीड कोटी सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करा असे आवाहन
नाम.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने कोल्हापूर मधील महासैनिक दरबार हॉल येथे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विभागीय “संघटन पर्व कार्यशाळेमध्ये बोलत होते.
या कार्यशाळेची सुरुवात प्रथम प्रतिमा पूजन करून त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
कार्यशाळेच्या सुरुवातीला चंद्रशेखरजी बावनकुळे रवींद्रजी चव्हाण चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार अनुक्रमे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील राजवर्धन निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला
पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.
याप्रसंगी बोलताना नामदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीत गुलाल उधळण्यासाठी राज्यातील हा सर्वात मोठा तिसरा विजय करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सभासद नोंदणी टप्पा पूर्ण करून सक्रिय सभासद जे असतील त्याच कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी ही जबाबदारी मिळणार असून लाडकी बहीण योजनेचा पंधराशे चा हप्ता 2100 करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी सदस्यता नोंदणी अभियानाचा उद्दीष्ट टप्पा पूर्ण करत उच्चांकी नोंदणी करणाऱ्या कराड, कोल्हापूर दक्षिण, सातारा विधानसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
उद्घाटन पर भाषण प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलताना राज्यातील भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदणी ही दीड कोटी सदस्य नोंदणी पार करण्यासाठी अवघ्या 34 लाखांचा उद्दिष्ट बाकी असल्याचे सांगितले त्याचबरोबर हे उद्दिष्ट गाठण्यासाठी निरनिराळ्या पाच टप्प्यातून नोंदणी करावी या नोंदणीमुळेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत त्वरित समजतील असे सांगितले.
प्राथमिक सदस्यता अभियान आढावा घेत आमदार विक्रांत पाटील म्हणाले, राज्यातील विधानसभा आणि जिल्हानिहाय सदस्य नोंदणी किती पार पडली याची आकडेवारी कार्यकर्त्यांच्या समोर ठेवली व ज्यांनी विशेष कामगिरी केली त्यांचा सत्कारही केला.
तसेच सक्रिय सदस्यता अभियान आढाव्यात प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांना या सक्रिय सदस्यांना काय फायदा त्याचे महत्त्व पटवून दिले तसेच आगामी बूथ रचना व पदाधिकाऱ्यांची निवड याबाबत माहिती दिली.
संघटन पर्वपर चर्चा या विषयावर बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होणारी यादीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केली असल्याचे सांगत या पक्षप्रवेश मुळे जिल्ह्यातील पार्टी सक्षम होणार असल्याचे सांगितले तसेच प्रत्येक पाचशे लोकांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यासाठी भारतीय जनता पार्टीतील बूथ अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सक्रिय सभासद अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या. कार्यकर्त्यांना महायुतीतील फार्मूल्यानुसार विविध अशासकीय पदांच्या संधीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यशाळेचा समारोप वंदे मातरम् गीताने झाला.
सुत्र संचालन अशोक देसाई यांनी केले तर आभार सदानंद राजवर्धन यांनी मांडले.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण,
चंद्रकांत दादा पाटील, जयकुमार गोरे, विक्रांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह निंबाळकर, धनंजय महाडिक, सुरेश हळवणकर, राजेश पांडे, गोपीचंद पडळकर, सुरेश खाडे, विक्रम पावसकर, विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, महेश जाधव, भरत पाटील, राहुल चिकोडे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.