आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा कोल्हापुरात बसवण्याचा निर्णय* _*दसरा चौक येथील मठात पुतळा बसवून बसव विचारांचा प्रसार करण्याचा निर्णय*_

Spread the news

*आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा कोल्हापुरात बसवण्याचा निर्णय*

_*दसरा चौक येथील मठात पुतळा बसवून बसव विचारांचा प्रसार करण्याचा निर्णय*_

कोल्हापूर: दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठात आज कर्नाटक शासननियुक्त चित्रदुर्ग मुख्य मठाचे प्रशासकीय अधिकारी व सेवानिवृत्त आय.ए.एस अधिकारी शिवयोगी कळसद, चित्रदुर्ग मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामीजी व बंगलोरचे जिल्हाधिकारी नितिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडली. चित्रदुर्ग बृहन्मठाची शाखा असलेल्या कोल्हापूर येथील चित्रदुर्ग मठाचे धर्माधिकारी व प्रमुख म्हणून परमपूज्य शिवानंद स्वामीजी यांची नेमणूक शासनाने केली आहे. चित्रदुर्ग बृहन्मठाचे अध्यक्ष असलेले शिवानंद कळसद यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मठाची संपूर्ण जबाबदारी परमपूज्य स्वामीजींना देण्यात आली. यावेळी विजापूर मठाचे सिद्धलिंग स्वामीजी उपस्थित होते.
यावेळी सौ. सरलाताई पाटील यांनी चित्रदुर्ग मठाचा इतिहास सर्वांसमोर मांडला व श्री महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा चित्रदुर्ग मठामध्ये बसविण्याचा कोल्हापूरवासियांचा मनोदय असल्याचे नमूद केले.
कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. ११२ वर्षांपूर्वी अथणी येथे राजर्षी शाहू महाराज व श्री जयदेव जगद्गुरुंची भेट झाली झाली होती यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराने राजर्षी शाहू महाराज प्रभावित झाले व त्यांनी बसव साहित्य व बसव तत्वांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी दसरा चौक येथे जागा दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या दसरा चौक येथील असलेल्या पुतळ्याजवळील याच मठात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य मठाकडून करू असे आश्वासन चित्रदुर्ग मठाचे मठाधिपतीनी यावेळी दिले. पुतळा बसविण्याबरोबर महात्मा बसवेश्वर यांच्या तत्वाच्या व विचारांच्या प्रसारासाठी मठाच्या संवर्धनासाठी लागेल ते सहकार्य करू व पूर्व वैभव प्राप्त करून देऊ असे शिवयोगी कळसद यानी सांगितले. यावेळी अजय डोईजड, सोमराज देशमुख, अनंत मुरगुडे, एस.आर हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजशेखर तंबाके, बाबुराव तारळी, एस.एम.महाजन, बापू चौगुले, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, श्रीकांत वडियार यांचेसह लिंगायत समाजबांधव उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!