केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्रउभारणीसाठी प्राथमिक शिक्षकांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय.
कोल्हापूर.. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानाचे व्यासपीठ आगीच्या भक्षस्थानी पडून नष्ट झाल्यामुळे ते पुनर्रउभारण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती कडील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक ,कर्मचारी व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.तसे पत्र कृती समितीच्या वतीने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान या ठिकाणी महानगरपालिका व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे अनेक संस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम दिमाखदारपणे संपन्न होत होते. आज या वास्तू नष्ट झाल्याने समस्त शिक्षक, विद्यार्थी, पालक अत्यंत व्यथित झालेला आहे. शाहू महाराजांच्या वैभवशाली परंपरेतील कलाक्षेत्राचे माहेरघर असलेले संगीतसूर्य केशव भोसले नाट्यगृह व कुस्तीची पंढरी असलेले शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान पुन्हा दिमाखात उभे राहावे यासाठी महानगरपालिका शिक्षण समिती कडील महापालिका व खाजगी शाळेतील शिक्षकांनी सामाजिक कृतज्ञता म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे .या प्रयत्नातून व शासन, महापालिका आणि समाज यांच्या प्रयत्नातून पुन्हा या दोन्ही वास्तू पूर्वी इतक्याच सुंदर व दिमाखात उभ्या राहाव्यात ही कोल्हापूरकरांची इच्छा आहे. त्यासाठी शिक्षक संघटनानी उचललेले हे पहिले पाऊल आहे . अशी माहिती खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे व शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांनी दिली .यावेळी खाजगी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे ,शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी उमेश देसाई,पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास पिंगळे, प्राथमिक शिक्षक संघाचे सातापा पाटील, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, राज्यसचिव शिवाजी भोसले, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे , पतसंस्थेचे संचालक सातापा कासार प्रभाकर लोखंडे, शिवाजी गुरव, अरुण गोते आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
– – – – –
–