दर्पण फाऊंडेशन तर्फे स्काॅलरशिप शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

Spread the news

दर्पण फाऊंडेशन तर्फे स्काॅलरशिप शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर, प्रतिनिधी

विदयार्थ्याला स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी, तो संस्कारक्षम व जबाबदार नागरिक व्हावा, यासाठी शालेय जीवनापासून त्याला विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. *स्कॉलरशिप परीक्षा हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो, याची जाणीव ठेवून दर्पण फाउंडेशन, कोल्हापूर आयोजित केलेला प्रशिक्षण वर्ग कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार विविध मान्यवरांनी काढले.

दर्पण फाउंडेशनच्या वतीने *दि. 22 व 23 ऑगस्ट 2024* रोजी म.न. पा.पद्मभूषण वि.स.खांडेकर विद्यालय ,कोल्हापूर येथे कोल्हापूर शहर व परिसरातील शिक्षकांसाठी मोफत स्कॉलरशिप मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक तज्ञ श्री उपस्थित होते या सर्वांनीच फाउंडेशनच्या उपक्रमांचा गौरव केला. यामध्ये *श्री. सात्ताप्पा शेरवाडे* (मराठी) *श्री. संदिप वाली* (बुद्धिमत्ता चाचणी) *श्री. दिगंबर वाईंगडे* (इंग्रजी) व *श्री.नामदेव निकम* ( गणित) ( सर्व राधानगरी ) यांचा समावेश होता.

शिक्षक स्कॉलरशिप मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन मा. सुधाकर सावंत ( शिक्षक – शिक्षकेतर उपाध्यक्ष , प्राथमिक शिक्षक समिती ) यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी श्री. विजय माळी (शैक्षणिक पर्यवेक्षक, इ.मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी केले. उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री. सुधाकर सावंत म्हणाले , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दर्पण फाउंडेशन ने आयोजित केलेली स्कॉलरशिप मार्गदर्शन कार्यशाळा शिक्षकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिक्षकांनी या कार्यशाळेचा फायदा करून घ्यावा . शैक्षणिक पर्यवेक्षक श्री.विजय माळी यांनी शिक्षकांना कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.

दोन दिवसीय या कार्यशाळेचा कोल्हापूर शहर व परिसरातील प्राथमिक ,माध्यमिक अशा जवळ -जवळ 80 शाळेतील सुमारे 160 शिक्षकांनी लाभ घेतला.* ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोल्हापूर मनपा वि. स. खांडेकर शाळेचे मुख्याध्यापक श्री.द्रोणाचार्य पाटील ,सेवक व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी खूप मोठे सहकार्य केले .
सदर कार्यशाळेसाठी मा.उपायुक्तसो- कोल्हापूर महानगरपालिका , मा.आर.व्ही.कांबळेसो, ( प्रशासन अधिकारी – प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर) राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी मा.दीपक मेंगाणेसो, शैक्षणिक पर्यवेक्षक, मा.श्री.संजय शिंदे ( प्राथमिक शिक्षण समिती – स्कॉलरशिप विभाग प्रमुख ), यांचे प्रशासनिक विशेष सहकार्य मिळाले.
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. कुमार पाटील , उपाध्यक्ष श्री. राम भोळे , सचिव- श्री. संजय कडगावे , कार्याध्यक्ष- श्री.अरुण गोते, सर ,खजानिस – श्री. युवराज सरनाईक ,सहसचिव श्री. सचिन यादव , श्री. संजय पाटील ,श्री.श्रीपाद रामदासी,श्री.महादेव डावरे यांनी परिश्रम घेतले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!