ज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी करा*
-डॉ. नितीन गंगणे यांचे आवाहन
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ उत्साहात
डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांचा डॉक्टरेटने सन्मान
कोल्हापूर
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदव्या आणि कमावलेली संपत्ती म्हणजे यश नव्हे. तर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी झाला तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी ठरू. आपल्या देशवासीयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करा, असे आवाहन के. एल. ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांनी पदवीधरांना केले.
कोल्हापूर येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात भव्य शोभायात्रेने दिक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती कुलपती डॉ. संजय डी.
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
या समारंभात स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ( डी. लीट.) या पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ६०५ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ११ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले डॉ. प्रीती प्रकाश बागवडे या विद्यार्थीनीला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.
डॉ. गंगणे म्हणाले, आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना यापुढेही सतत शिकत रहा. पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. नव्या क्षेत्रात प्रवेश करत असताना नव्या घडामोडींसह अद्ययावत रहा, इतरांकडून चागल्या गोष्टी आत्मसात करा, कन्फर्ट झोन मधून बाहेर या. वैद्यकीय उपचार, टेलिमेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन तंत्रज्ञानामधील नवकल्पना यांच्या मदतीने तुमच्या व्यवसायात आघाडीवर रहा. इतरांची प्रभावीपणे काळजी घेण्यासाठी आपण स्वत: तंदुरुस्त रहा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल ठेवा. स्वत:वर आणि स्वत:चा क्षमतेवर विश्वास ठेवून कार्यरत रहा, असे आवाहन डॉ. गंगणे यानी पदवीधारकांना केले.
डॉ. शेखर भोजराज म्हणाले, आज झालेला सन्मान हा माझा वैयक्तिक सन्मान नसून स्पाईन फाउंडेशनच्या कार्याचा हा गौरव आहे.
बाळ पाटणकर म्हणाले, आपण समाजासाठी काय करतो याच्यावरून आपले कर्तुत्व ठरते. विद्यार्थ्यांनीही आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठात घेतलेल्या ज्ञानाचा सर्वसामान्यसाठी उपयोग होईल असा सतत प्रयत्न करा असे आवाहन त्यानी केले.
कुलगरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकाना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती दिली.
यावेळी या समारंभाला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ वेदप्रकाश मिश्रा, डॉ शेखर भोजराज, डॉ आर. के. मुदगल, आर. ए. (बाळ) पाटणकर, डॉ. विजय खोले,कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सौ वृशाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, मेघराज काकडे, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, मेडिकल कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, प्राचार्य डॉ. उमारणी जे, प्राचार्य चंद्रप्रभू जंगमे, प्राचार्य डॉ आर. एस. पाटील, प्राचार्य अमृत कुंवर रायजादे, प्राचार्य रुधिर बारदेस्कर, संचालक डॉ. अजित पाटील, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, डॉ. पी बी साबळे, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. शिरीष पाटील, सीएचआरओ श्रीलेखा साटम, संजय जाधव, सुरश खोपडे, कृष्णात निर्मळ, अजित पाटील, भोजराज व पाटणकर कुटुंबीय यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थामधील प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
६०५ विद्यार्थ्याना पदवी*
१५६ विद्यर्थ्याना एमबीबीएस पदवी, ५ जणांना पीएच.डी, ४१ जणांना एमडी, ३३ एम.एस., १९ विद्यार्थ्यांना फेलोशिप, ८६ बी.एस्सी नर्सिंग, २६ पोस्ट बेसिक नर्सिंग, १४ एमएससी नर्सिंग, ३३ बी.एससी होस्पिटलिटी, १८ एम.एस्सी. मेडीकल फिजिक्स, १९ एम.एस्सी. मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, ६६ पीजीडीएमएलटी, ४३ ओटी टेक्निशियन आणि ८ डायलेसीस, बी.एससी एमआरआयटी २४, बी.एससी एमएलटी १०, बी.एससी ओटीटी ४ पदवी व पदविका यावेळी प्रदान करण्यात आल्या.
*११ जणांना