कोल्हापूर
महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रिडाई महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे तर कोल्हापूरचे विद्यानंद बेडेकर यांच्यासह सहा जणांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या संचालकांच्या बैठकीत ही निवड झाली. पुढील तीन वर्षासाठी ही निवड आहे.
उपाध्यक्ष म्हणून सुनील कोतवाल, अनिश शहा, विनेश डांगे, आदित्य जावडेकर, विद्यानंद बेडेकर, शशिकांत जिद्दीमनी व जयंत ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे.
सचिव म्हणून आशिष पोखरणा तर खजानिस म्हणून सुरेंद्र भोईटे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.