कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वराज्य आणण्यासाठी तुतारी वाजवा* *राजे समरजितसिंह घाटगे* *कडगावमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप*

Spread the news

*कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वराज्य आणण्यासाठी तुतारी वाजवा*

*राजे समरजितसिंह घाटगे*

*कडगावमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप*

गडहिंग्लज,प्रतिनिधी.

कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात पून्हा स्वराज्य आणण्यासाठी तुतारी वाजवा.असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कडगाव (ता गडहिंग्लज )येथे समरजितसिंह आपल्या दारी उपक्रम अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी दोनशेहून अधिक बांधकाम कामगारांना या साहित्याचे वाटप केले. केदारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी अशोक पाटील तर व्हा.चेअरमनपदी जोतिबा पाटील यांची निवड झाल्याबद्दल घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला .

घाटगे पुढे म्हणाले,आमच्या आईसाहेबांवर अवमानकारक वक्तव्य विरोधक करत आहेत. स्वतःला श्रावणबाळ म्हणणाऱ्यांनी माता भगिनींना त्यांच्या फाउंडेशनच्या दारात रांगेत उभा करून महिला वर्गाचा अवमान केला आहे. गट तट विरहितपणे विकासकामे केली म्हणणाऱ्या विरोधकांनी आमच्या कार्यकर्त्यांची सातत्याने अडवणूक केली. त्यांना त्रास दिला. कार्यकर्त्यांनो हा त्रास आणखी फक्त दोन महिने सहन करावा. त्यानंतर आपणच आमदार आहोत.

यावेळी सुनील गुरव शहाजी पाटील संजय कांबळे व बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर संजीत घाटगे दिलीप मोरे रवींद्र घोरपडे अशोक पाटील जोतिबा पाटील परशुराम कांबळे बाळासो इंजल सचिन दळवी पांडुरंग दळवी ऋतुराज रणनवरे अभिजीत देसाई अभिजीत पाटील सुधाकर शेवाळे जयसिंग पाटील आदी उपस्थित होते

चौकट
विकासकामांच्या पुढे ठेकेदाराचेही नाव लिहा

विरोधक पंचवीस वर्षात केलेल्या विकास कामांचे पुस्तक काढणार असे म्हणत आहेत.ते बघून आमचे डोळे पांढरे होतील असेही म्हणत आहेत.आमचे डोळे पांढरे होणे व या कामांच्या दर्जाचा भाग बाजूला ठेवूया. मात्र माझी विरोधकांना एक सूचना आहे. या प्रत्येक कामाच्या पुढे त्यांनी ठेकेदाराचेही नाव लिहावे.त्यामुळे त्यांनी किती युवकांवर अन्याय केला व मर्जीतील मोजक्याच ठेकेदारांचा केलेला विकास दिसेल. अशी कोपरखळी घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांना नाव न घेता मारली.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!