संविधानिक पद नसताना विकासकामांसाठी दिडशेहे कोटी निधी आणला.* राजे समरर्जीतसिंह घाटगे.

Spread the news

*संविधानिक पद नसताना विकासकामांसाठी दिडशेहे कोटी निधी आणला.*

राजे समरर्जीतसिंह घाटगे.

*जनसेवेसाठी २४ तास उपल्बध*

भडगाव /वार्ताहर
दि.२६:
कोणतेही संविधानिक पद नसताना दीडशे कोटी हून अधिक रुपयांचा निधी कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी खेचून आणला असे प्रतिपादन महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मळगे बुद्रुक (ता.कागल) येथे आयोजित केलेल्या परिवर्तन जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले विकासकामांसाठी निधी देताना पिण्याचे पाणी, शासकीय दवाखाने,शाळा, अंगणवाडी यांस प्राधान्य दिले. विकास कामातील पहिला निधी महिलांच्या टॉयलेट बांधकामासाठी लावला काम छोटे आहे.पण महीलांच्यासाठी महत्वाचे आहे. मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
ते प्राधान्याने सोडविनेचा माझा प्रयत्न आहे.
लोकांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही समरर्जीत आपल्या दारी हा उपक्रम राबवला त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
लोकांना सहजरित्या आपल्याला भेटता यावे. यासाठी विभागवार जनता दरबाराचे आयोजन आम्ही करीत असतो. नागरिकांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी मी 24 तास उपलब्ध आहे.

शाळेसाठी ई लर्निंग किट दिले.कोणताही गट तट न पाहता पैलवानांना मानधन सुरू आहे. अनेकांना ऑपरेशन साठी व इतर उपचारासाठी मदत केली त्यांची ऑपरेशन करून आणली. बांधकाम कामगार योजना,उज्ज्वला गॅस योजना घराघरात पोहोचवली.

स्वागत व प्रास्ताविक दिगंबर अस्वले यांनी केले. यावेळी राज कांबळे, शिवानंद माळी, संदेश भोसले, महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सागर कोंडेकर, संभाजी भोकरे, दिनकर गोते, पी.एस. वडर, विशाल तिराळे, प्रदीप पाटील, बाळासो मेटकर आदी प्रमुख उपस्थित होते आभार सागर कमळकर यांनी मांनले.

*
*हीच तर कागल मध्ये परिवर्तनाची नांदी*

दिगंबर अस्वले म्हणाले,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी लोक यावेत,गर्दी व्हावी म्हणून आजपासूनच जेवणाच्या पासचे वाटप चालू आहे. तरीही बरेच गावकरी राजेंच्या सभेला उपस्थित आहेत हीच खरी परिवर्तनाची नांदी आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!