षडयंत्री महायुती सरकारला गाडा
दिग्विजय कुराडे यांचे प्रतिपादन
गोपाळराव पाटील येत्या दोन तीन दिवसात नंदाताईच्या प्रचारात सक्रीय
चंदगड
शहा-फडणवीसांनी महाराष्ट्राच्या वैचारीकतेला, संस्कृतीला काळे फासले. सतेसाठी ईडीचा वापर केला. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडावा, अशी जनतेची संभ्रमावस्था झाली. कायदा पायदळी तुडवून हे सरकार काम करत आहे. जनता हे विसरणार नाही. महायुतीचे हे षडयंत्री सरकार गाडा, असे आवाहन काँग्रेसनेते दिग्विजय कुराडे यांनी केले. डॉ. नंदिनी बाभुळकर यांच्या प्रचारार्थ कागीणवाडी सभेत ते बोलत होते.
दिग्विजय कुराडे पुढे म्हणाले, आज राज्यात सर्वच घटकात आक्रोश आहे. कॉन्टक्टरदारांची ४७ हजार कोटीची बिले थकीत आहेत. त्यांनी कामे थांबवली आहेत. अंगणवाडी सेविका, एस. टी. कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी, आशा सेविका यांचे सर्व मोर्चे चिरडून टाकले गेले. लोकशाहीचा गळा घोटला आहे. सर्वच आघाडीवर हे सरकार अपयशी ठरलं. काँग्रेसचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे.
ते पुढे म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील येत्या दोन तीन दिवसात नंदाताईच्या प्रचारात सक्रीय आघाडी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना डॉ. नंदिनी बाभुळकर म्हणाल्या, या सरकारने लाडक्या बहिनींना पंधराशे दिले. आणि त्या जाहिराती वरती २७० कोटी खर्च केले. या खर्चात २७ हजार घरे बांधून झाली असती. केवळ स्वतःची आरती ओवाळून घेण्यासाठी आणि पापावर पांघरून घालण्यासाठी सरकारचा हा खटाटोप चालू आहे. यावेळी सचिन सावंत, सुनील निऊगरे, जानबा सावंत, शामराव कुंभीकर, मारूती बुगडे, बाळकृष्ण कुरळे उपस्थित होते.