निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा हे प्रल्हाद चव्हाण यांच्याकडून शिकावे
निष्ठावंत प्रल्हाद चव्हाण यांच्या जयंतीला सर्वपक्षीय मेळा
कोल्हापूर
तब्बल 22 वर्षे कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषवलेल्या आणि आयुष्यभर काँग्रेस पक्षाबरोबर प्रामाणिक राहात निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या प्रल्हाद चव्हाण यांची 84 वी जयंती निष्ठावंत कार्यकर्त्यांची जयंती म्हणून साजरी करण्यात आली. पक्षावर निष्ठा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणून प्रल्हाद चव्हाण यांचे नाव कायम स्मरणात राहील अशा भावना यावेळी उपस्थित असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. कोल्हापूरच्या विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान असलेल्या या निष्ठावान कार्यकर्त्याला अनेकदा डावलण्यात आले, पण त्यांनी कधी पक्ष सोडला नाही. निष्ठा सोडली नाही. याच पार्श्वभूमीवर त्यांची 84 वी जयंती निष्ठावंताची जयंती म्हणून साजरी करण्यात आली. चव्हाण कुटुंब, मित्रपरिवार, नाथागोळे तालीम परिसरातील तालीम संस्था, तरुण मंडळ यांच्यावतीने ही जयंती साजरी करण्यात आली.
समाजाच्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावून चव्हाण यांना आदरांजली वाहिली. माजी महापौर सागर चव्हाण आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या यांच्या पुढाकाराने यावेळी दिवाळी फराळ या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी श्रीमंत शाहू खासदार शाहू महाराज, चेन्नईचे आमदार आणि काँग्रेसचे निरीक्षक हसन मौलाना, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर, शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर महादेवराव अडगुळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, माजी नगरसेवक अर्जुन माने, अफजल पिरजादे, रवी आवळे, प्रकाश चौगुले, विजय सूर्यवंशी, प्रताप जाधव, संदीप सरनाईक, युवराज गायकवाड, संजय मोहिते, शेखर जाधव अजित मोरे, नियाज खान, शेखर घोटणे, संध्या घोटणे, तौफिक मुलाणी, कैलास गौडदाब, बाबासाहेब ठोकळे, सुरेश ढोणुक्षे, सुनील महाजन, उदय दुधाणे,उदय जगताप, फिरोज सौदागर रियाज सुभेदार महेश उत्तुरे कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते, विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.