सक्षम संविधानामुळे भारतातील विविधतेत एकता
– अरुण डोंगळे
चेअरमन, गोकुळ दूध संघ
‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
कोल्हापूर, ता.१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सक्षम संविधानामुळे भारतातील विविधतेत एकता दिसून येते. यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. भविष्यातही त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली मूल्ये निश्चितच प्रेरणादायी असतील तसेच डॉ.आंबेडकर यांनी संविधानाच्या स्वरुपात जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला दिली आहे. लोकशाही सदृढ करण्याच्या दृष्टीने आणि भारताला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी भारतातील सर्व लोकांना समान मतदानाचा अधिकार देण्याचे एक महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण डॉ.आंबेडकर यांचे विचार आणि जीवनातून काही खास गोष्टी शिकुया आणि त्याचे पालन करण्याचा संकल्प करुया. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर म्हणाले कि, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील विविध जाती, धर्म आणि पंत एकत्रित ठेवण्याचे काम तसेच सामाजिक न्याय, दलित हक्क, आणि भारतीय संविधान निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून भूमिका बजावली. त्यांनी संविधानात समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे तत्त्वे समाविष्ट केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यामुळे सामाजिक न्यायासाठी एक मजबूत आधार दिला आणि भारतीय समाजाला प्रगतीकडे नेण्यास मदत केली असल्याचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ.सुजित मिणचेकर, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, मुरलीधर जाधव, बयाजी शेळके, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, एस.आर.पाटील, डॉ.मगरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
—————————————————————————————————-
फोटो ओळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ.सुजित मिणचेकर, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, मुरलीधर जाधव संघाचे अधिकारी आदी दिसत आहेत.
—————————————————————————————————-