सर्वसामान्यांचा पैसा बड्या ठेकेदारांच्या घशात
काॅ.दिलीप पवार यांचा आरोप
उपस्थित आठशे कामगार प्रतिनिधीनी प्रत्येकी हजार मतदारांशी सुसंवाद साधुन शाहू महाराजांच्या पाठीशी ताकद लावन्याचा घेतला निर्णय
कोल्हापूर –चंदा दो ,,धंदा लो ‘ म्हणत भाजप सरकारने ठेकेदार वर्गाला जनतेच्या खिशांतून कररूपाने संकलित केलेली कमाई वाटून टाकत आहे, त्याबदल्यात हजारो कोटी रूपयांचा निधी जमवला असल्याचा आरोप कॉ.दिलीप पवार यांनी केला. महागाई वाढवत सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील करणारे हे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा आणि शहर शाखा तसेच पक्षाशी संलग्न असणाऱ्या आयटक कर्मचारी संघटना ,गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटना ,घरेलू कामगार संघटना ,जिल्हा मध्यवर्ती बैंक कर्मचारी संघटना ,करवीर कर्मचारी संघ ,कोल्हापूर फेरीवाले संघटना ,आयटक कामगार केंद्र ,शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना ,शिरोली एम आयडीसी ,गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहत तसेच काग़ल पंचतारांकित औद्योगिक वसाहती मध्ये कार्यरत असणाऱ्या आयटक संलग्न विविध कामगार संघटनांच्या हजारो प्रतिनिधीनी काँग्रेस कमिटी मध्ये मेळावा झाला. यामध्ये एकमुखाने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांच्या निर्विवाद विजयासाठी पाठिंबा जाहीर करत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला .
यावेळी बोलताना कॉ. दिलीप पवार यानी निवडणूक रोखे हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाला असल्याचा आरोप केला. पाच किलो धान्य वाटप करुन आपली टिमकी वाजवत असलेल्या भाजप सरकारला खाली खेचुया असे आवाहन त्यानी केले.
रघुनाथ कांबळे म्हणाले, कामगार आणि श्रमिकविरोधी भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि या पक्षाच्या सर्व संलग्न संघटनानी एकमताने शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहीर सदाशिव निकम यानी ‘नको ग माय ,आता मोदी सरकार नको ,,,मोदीही नको आणि देवेंद्रही नको ,अशा आशयाचे गीत सादर करत भाजप सरकारला निरोप देण्यासाठी कामगार आणि कष्टकरी लोक पुढे येतील ,असा आशावाद व्यक्त केला
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ सतीशचंद्र कांबळे यानी मोदींच्या गॅरंटी पेक्षा इंडिया आघाडीची गॅरंटी महत्वाची असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यानी आपण बाजारात भाजी देखील निरखुन घेतो, मग देशाच्या कायदे करणाऱ्या खासदार निवडणुकीत देखील विचारपूर्वक मतांचा अधिकार वापरला पाहिजे असे मत व्यक्त केले.
आयटक शी संलग्न असलेल्या सर्व कामगार संघटनांनी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल शाहू छत्रपती ने आभार व्यक्त केले इंडिया आघाडी कायम कामगारांच्या पाठीशी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यानी असंघटीत कामगार आणि त्यांची एकजुट शाहू महाराजांना विजयी करण्यास सहाय्यभूत ठरेल ,असा विश्वास व्यक्त केला.
बाबूराव इंगले ,माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कामगार नेते बाळासाहेब मोळे , कॉ शिवाजी सुतार ,सम्राट मोरे ,कॉ बाबूराव तारळी , कॉ बी एल बरगे, कॉ बाळासाहेब पवार ,कॉ एस बी पाटील कॉ कृष्णात किरुलकर ,कॉ मल्हार पाटील, कॉ भगवान पाटील आदिंची भाषणे झाली . यावेळी काँग्रेस नेते शशांक बावचकर ,घरेलू कामगार संघटनेच्या नेत्या सुशीला यादव ,कुंडलिक एकशिंगे ,सागर मळगे ,शुभांगी पाटील अण्णा एडग़े ,इम्तियाज पठाण ,अमीन पाटणकर रघुनाथ देशिंगे,आनंदा गुरव, एड बाबासाहेब पवार ,आनंदराव परुलेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
……….