चोकाक – अंकली गावांना चौपट भरपाई द्या : खासदार धैर्यशील माने यांची अर्थ संकल्पीय अधिवेशनात मागणी

Spread the news

चोकाक – अंकली गावांना चौपट भरपाई मिळावी : खासदार धैर्यशील माने यांची अर्थ संकल्पीय अधिवेशनात मागणी

  1. U­

 

कोल्हापूर , ता. २५ : रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या महामार्गावर असणाऱ्या चोकाक ते अंकलीपर्यंतच्या गावांना दुप्पट भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे ज्यामुळे येथील नागरीक व शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.केंद्र सरकारने येथील नागरीकांना व शेतकऱ्यांना चौपट भरपाई द्यावी अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार धैर्यशील माने यांनी केली.
यावेळी देव, देश आणि धर्मासाठी आपले प्राण अर्पण करणारे शिवपुत्र संभाजी महाराज यांचा ‘ छावा ‘ चित्रपट देशाच्या संसदेत लावण्यात येत आहे.याचा महाराष्ट्रातील लोकांना अभिमान आहे. मात्र औरंगजेबाचा पुरस्कार करणारे काही लोक हा चित्रपट संसदेत प्रदर्शित करू नये असे म्हणत आहेत त्यांचा खासदार माने यांनी निषेध व्यक्त केला. त्याबरोबर कर्नाटक सरकारमध्ये एकीकडे विरोधी पक्षाचे लोक हातात संविधान घेऊन ते वाचवले पाहिजे असे म्हणत आहेत तर दुसरीकडे हेच लोक संविधान बदलण्याची भाषा करतात.अशा लोकांचा निषेधही खासदार माने यांनी सभागृहात केला.
काँग्रेसच्या काळात ६० हजार रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकर माफ होता मात्र मोदी सरकारने १२ लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्यांना आयकर माफ करून सामान्य जनतेला न्याय दिला आहे.शेतकऱ्यांच्या फायदा व्हावा यासाठी पारदर्शक निधी निर्माण करण्यासाठी करप्रणाली सुलभ करण्याची गरज आहे.परंतु शेतकऱ्यांवरील भार आणखी कमी करणे आवश्यक आहे.जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल. कृषी क्षेत्रात ५% जीएसटी आहे. पूर्वी, ते इनपुटवर ६% होते. आज अमोनिया आणि कच्च्या मालावर १८% जीएसटी आहे. जर ते कमी केले तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.

  •  

चौकट :
गांजा भूत जोकरांसाठी कडक नियमावली करा . . .
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावर एक गांजा भूत जोकर काहीतरी टीका टिपणी करत आहे. विनोदाच्या नावाखाली काही लोक त्यांचा राजकीय व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांसाठी कडक नियमावली तयार करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनीकेली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!