बालसाहित्यिका डॉ लीला पाटील यांचे निधन
कोल्हापूर
येथील ज्येष्ठ लेखिका, बालसाहित्यिका डॉ. लीला पाटील यांचे कोल्हापुरात निधन झाले. निधनासमयी त्या 81 वर्षाच्या होत्या. प्रसिद्ध लेखिका सौ. अनुराधा गुरव यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.
पाटील यांनी अनेक वर्षे गारगोटी येथील मौनी विद्यापीठात कार्य केले. कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य होत्या. त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी. मिळवली होती. विविध विषयावर शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके विद्यापीठ स्तरावर क्रमिक पुस्तके म्हणून वापरली जातात. तसेच विविध वृत्तपत्रातून मासिकातून शेकडो लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक शाळा कॉलेजेस व साहित्य संमेलनातून शेकडो व्याख्याने दिली आहेत.
बालकांचे प्रश्न, रंजल्या गांजल्या, उपेक्षित, घटस्फोटीत महिलांचे प्रश्न यावर पाटील यांनी विुपल लेखन केले. त्यांचे मुळगाव सोलापूर जवळ खंडोबाचे बाळे. एकूण 11 भावंडे. सहा भाऊ आणि पाच बहिणी. पाटील यांची गारगोटी मौनी विद्यापीठ येथे कारकीर्द बहरली. ज्येष्ठ नागरिक संघात कार्यरत होत्या.