मुख्यमंत्री निवडणुकीनंतर आकडेवारीवर ठरणार आत्ताच चेहरा जाहीर करण्याचा आग्रह कशाला?

Spread the news

मुख्यमंत्री निवडणुकीनंतर आकडेवारीवर ठरणार

आत्ताच चेहरा जाहीर करण्याचा आग्रह कशाला?

शरद पवार

कोल्हापूर

राज्याचा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री हा निवडणुकीतील आकडेवारीवर ठरेल असे स्पष्ट करतानाच आत्ताच चेहरा देण्याचा आग्रह कशाला? असा सवाल करत शरद पवार यांनी ज्याचे ज्यादा आमदार त्याचा मुख्यमंत्री हाच फॉर्मुला जाहीर केला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजकारण नाही तर स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचा टोला त्यांनी मारला.

तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या असलेले माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले 1978 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा चेहरा नव्हता. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान करण्यात आले. आत्ताही महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करायची गरज नाही. त्याचा विचारही करण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीनंतर मताच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री ठरेल. तो कोणाचा असेल तेही ठरेल.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आपण राजकारण करत नाही. पण एवढी मोठी घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. लोकांची प्रतिक्रिया आहे, यात कसल राजकारण असा सवाल त्यांनी केला. राज्यात आणि देशातही लोकांना बदल हवा आहे, आता एकत्र येऊन तो बदल करण्याची जबाबदारी आमची आहे असे सांगताना पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी यांना पर्याय नाही असे सांगितले जात होते. पण हे वास्तव नव्हते 400 पार चा नारा त्यांनी दिला. पण, 230 पर्यंतच ते पोहोचले. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्यांच्यासोबत नसते तर हे सरकारही आले नसते. यामुळे लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सात, आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी संयुक्त बैठक होणार असून त्या त्यानंतर जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट याबरोबरच डाव्या पक्षानाही सोबत घेतले जाईल.

 

काय म्हणाले
शरद पवार

शिवाजी महाराजांनी एकदा नव्हे तर दोन वेळा सुरतीची लूट केली

एकाच वेळी निवडणुका घेण्याचा आग्रह धरणाऱ्या पंतप्रधानांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना प्रत्येक राज्याचा वेगळा केला

लाडक्या बहिणीसाठी इतर चांगल्या योजनांचा निधी वळवला हे चांगलं नाही

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील
निवडणूक प्रक्रिया संपू शकते

सरकार गुन्हेगारांना शोधण्याची जबाबदारी टाळत आहे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!