*महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे 2019-20 सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी – अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
कोल्हापूर
जिल्हयात जुलै २०२४ मधील अतिवृष्टीने आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे २०१९-२० या सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्याची विनंती मा. आम. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
कोल्हापूर जिल्हयात या महापूरामुळे शेतकऱ्यांच्या ऊस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच व्यापार, उद्योग, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरांची पुराच्या पाण्यामुळे पडझड होवून नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना देखील जास्तीत-जास्त आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.
या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना सन २०१९-२० मध्ये आलेल्या महापूरावेळी ज्याप्रमाणे पंचनामे झाले त्याचप्रमाणे याही वेळेस पंचनामे करून शासनामार्फत त्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करणे आवश्यक असल्याचे महाडिक यांनी मुख्यंत्र्यांची भेट घेऊन सांगितले.
..
शासनामार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर रोख स्वरूपात मोबदला मिळावा यासाठी सर्व स्तरावर माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
– अमल महाडिक