*शिवसेनेची ध्येयधोरणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनहिताचे काम सोशल मिडीयाच्या माध्यमातून तळागाळात पोहचवा : राजेश क्षीरसागर*
*शिवसेनेचे सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा शिबीर संपन्न*
कोल्हापूर :
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रचारासाठी सोशल मिडीया हे माध्यम प्रभावी ठरणार आहे. आधुनिक काळात प्रचार यंत्रणांच्या बदलेल्या प्रणालीचा योग्य वापर करून मतदारांपर्यंत पक्षाचे काम पोहचविण्याचे आव्हान शिवसैनिकांनी पेलावे लागणार आहे. शिवसेनेची ध्येयधोरणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनहिताचे काम आणि युती सरकारचे लोकोपयोगी निर्णय सोशल मिडीयाच्या माध्यमातून तळागाळात पोहचवा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने राज्यभर सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात हे शिबिर घेण्यात आले.
मार्गदर्शन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आजच्या घडीला ८० टक्के लोकांकडे आधुनिक मोबाईल आहेत. त्यावर व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर सारखी दैनंदिन वापरातील सोशल मिडीया साधने उपलब्ध आहेत. एखादी गोष्ट व्हायरल करायची असेल तर काही सेकंदात हजारो – लाखो लोकांपर्यंत ती पोहचविण्याची ताकद सोशल मिडीया मध्ये आहे. सोशल मिडीयाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना जागच्या जागी मूठमाती देवून पक्षाचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. सद्याच्या घडीला विरोधकांकडे टिके शिवाय दुसरे काम शिल्लक नाही तर आपल्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय कामाच्या रूपाने दिसतील. हाच दोन्हीतील फरक नागरिकांपर्यंत न्या, कोल्हापुरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचेच असून, यावर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकविण्यास सज्ज व्हा, अशा सूचना दिल्या.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनेत कोणतेही गट – तट नाहीत. शिवसेना नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी एकसंघ राहिली आहे. कोल्हापुरातून शिवसेनेचे दोन्ही खासदार विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करून कामाला लागावे. पक्ष देईल ते काम आदेश मानून काम करा.
सुमित शेलार यांनी सोशल मिडीया कार्यकर्ता कार्यशाळा शिबीर अंतर्गत करण्यात येणाऱ्या उपक्रमांची आणि सोशल मिडिया वापरण्याच्या पद्धतीची सविस्तर माहिती शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दिली.
या शिबिरात युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, मंडलिक कारखाना संचालक वीरेंद्र मंडलिक, महिला आघाडी शहरसंघटिका अमरजा पाटील, उपजिल्हाप्रमुख अमोल माने, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी केले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, किशोर घाटगे, प्रा.शिवाजी पाटील, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, समन्वयक पूजा भोर, मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, सुनिता भोपळे, गीता भंडारी, शहर समन्वयक सुनील जाधव, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, विश्वदीप साळोखे, विपुल भंडारे आदी शिवसेना पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, रिक्षा चालक सेना, फेरीवाले सेना, कामगार सेना, अनुसूचित जाती जमाती सेना सह सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
.