*शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ उद्या धडाडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दि.०९ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर*
*शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा दसरा चौकात*
कोल्हापूर दि.०८ : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब दि.०९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या या कोल्हापूर दौऱ्यात शहरातील दसरा चौक मैदान येथे सायंकाळी ६.०० वाजता शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या सभेला येतील आणि दसरा चौक मैदानावर शिवसैनिकांच्या गर्दीचा महापूर दिसेल, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
याबाबत माहिती देताना राजेश क्षीरसागर यांनी, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जनकल्याणकारी योजनांचा धडाका लावला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडका भाऊ अशी प्रतिमा तयार झाली आहे. शिवसेनेस वाढता प्रतिसाद ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची पोहच पावती आहे. त्यामुळे उद्याच्या सभेची जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या सभेत शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ धडाडणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे प्रतिपादन केले.
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांच्या विकासकामाचे उद्घाटन*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूर शहरास दिला आहे. यामुळे शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून, या विकासाकामांचा उद्घाटन सोहळा उद्या दि.०९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दसरा चौक मैदान येथे पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर सांगली जिल्हा पूरनियंत्रण करणे, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणे., अमृत २.० योजना पहिला टप्पा, अमृत २.० योजना दुसरा टप्पा, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधा पुरविणे, पंचगंगा नदी घाट सुशोभिकरण करणे, पंचगंगा नदी घाट येथे विविध विकासकामे करणे, गांधी मैदान येथे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये रस्ते डांबरीकरण करणे, शहरात ठिकठिकाणी हेरीटेज लाईट बसविणे, रंकाळा तलाव येथे म्युजीकल फौंऊटेन उभारणे, रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करणे, रंकाळा तलाव येथे मिनिचर पार्क तयार करणे, पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्ती व नुतनीकरण करणे, सिद्धार्थनगर येथे पूरसरंक्षक भिंत बांधणे, श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराअंतर्गत म्युझिकल हेरीटेज स्ट्रीट लाईट बसविणे, छत्रपती शिवाजी स्टेडियमचे सपाटीकरण करणे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे विरंगुळा उद्यान तयार करणे.
को.म.न.पा.प्र.क्र.३१ बाजारगेट अंतर्गत श्री निरंजन संस्था तालीम मठ येथे धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल विकसित करणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध गार्डनमध्ये बैठक व्यवस्था (बेंचेस) बसविणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये ओपन जिम व उद्यानामध्ये व्यायामाचे साहित्य बसविणे, कोल्हापूर शहरात ओला, सुका, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी वेट आणि ड्राय गारबेज कलेक्टर बसविणे, को.म.न.पा.प्र.क्र.१ शुगरमिल अंतर्गत कसबा बावडा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक विकसित करणे, को.म.न.पा.प्र.क्र.५६ मधील म.न.पा.चे रि.स.नं.४६२ येथील (ओपन स्पेस) संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे, शाहू उद्यान विकसित व सुशोभिकरण करणे, कसबा बावडा येथील हनुमान तलावाचे संवर्धन व सुशोभिकरण करणे अशा एकूण रु.४५०० कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.